HW News Marathi
महाराष्ट्र

‘स्वत:चं पोरं बसवलंय मंत्रीमंडळात; ST कामगारांची मुलं धाडलेत मृत्यूच्या दारात’-गोपिचंद पडळकर

मुंबई | पडळकर यांच्या या ट्वीटमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खरमरीत शब्दांत टीका केली आहे. ते म्हणतात, स्वत:चा पोरगा बसवलाय मंत्रीमंडळाच्या मखरात आणि एसटी कामगारांची मुलं मात्र धाडलेत मृत्यूच्या दारात. युवराजांचे बाबा झाले ‘एसटी’ कामगरांचे यमराज असा गंभीर आरोपही त्यांनी या ट्वीटद्वारे केला आहे. मागील दोन दिवसांत एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलन केले. दरम्यान प्रलंबित मागण्या आणि होणार त्रास यामुळे अहमदनगर येथील एका कर्मचाऱ्याने एसटीच्या मागच्या बाजून गळफास लावून आत्महत्या केली. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला आहे.

ही टीका त्यांनी एका कार्टूनद्वारे दर्शित केली

यानंतर नाशिक येथे घडलेल्या घटनेमुळे पुन्हा एकदा विरोधकांनी ठाकरे सरकारला धारेवर धरले आहे. भाजपाच्या आमदार गोपिचंद पडळकर यांनी ट्वीट करुन ठाकरे सरकार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. दरम्यान ही टीका त्यांनी एका कार्टूनद्वारे दर्शित केली आह. यात एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन नाही, त्यांचा कमी पगार, कामगारांना बडतर्फची नोटीस आणि एसटी कर्मचाऱ्याचा मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न असे चित्रे काढली आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कार्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील पंच प्रभाकर साईल यांचा मृत्यू

Aprna

बाबा या वयात मी फिरतोय तु किमान घराबाहेर पड, असं शरद पवारांना म्हणायंचं असेल – चंद्रकांत पाटील

News Desk

“…ही त्यांची खंत आहे, म्हणून त्यांना गरळ ओकायची सवय लागलीये”, अजित पवारांचा आशिष शेलारांवर निशाणा!

News Desk