HW News Marathi
महाराष्ट्र

कोरोना चाचणीतून गणेशभक्तांची सुटका नाहीच!

मुंबई। गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी कोरोना चाचणीची अट कायम आहे. प्रवासाच्या ७२ तासांआधीचा ‘आरटीपीसीआर’ अहवाल किंवा दोन लसमात्रा असल्या तरच कोकणात प्रवेश मिळेल, असे प्रशासनाने स्पष्ट केले. या दोन्हींपैकी काहीही नसल्यास गणेशभक्तांना एसटीचे थांबे किंवा रेल्वे स्थानकाबाहेर कोरोना चाचणी केंद्रावर चाचणीला सामोरे जावे लागेल. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी आतापर्यंत २ हजार १०९ एसटी गाड्या आरक्षित झाल्या आहेत. त्यात गट आरक्षणाच्या एसटींचाही समावेश आहे. मुंबई, ठाणे, पालघर तसेच पुण्यातून या गाड्या कोकणाकडे रवाना होतील. ४ सप्टेंबरला ४९ एसटी, ५ सप्टेंबरला ६६ एसटी सुटतील. ७ सप्टेंबरला ४०१ आणि ८ सप्टेंबरला सर्वाधिक १ हजार २२९ एसटी कोकणाच्या दिशेने जातील.

गणेशोत्सवानिमित्त कोकणात येणाऱ्यांना ७२ तास आधीचा कोरोना चाचणी अहवाल सादर करावा

याशिवाय २१७ हून अधिक विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या आहेत. एकच मात्रा घेतलेल्या प्रवाशांनीही आरक्षण केले आहे. एसटी स्थानक, आगार आणि रेल्वे स्थानकाबाहेर कोरोना केंद्र उभारण्यात येणार आहे. गणेशोत्सवानिमित्त कोकणात येणाऱ्यांना ७२ तास आधीचा कोरोना चाचणी अहवाल सादर करावा लागेल किंवा दोन लसमात्रा घेतल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. दोघांपैकी काही नसल्यास आगार किं वा स्थानकात उभारलेल्या कोरोना चाचणी केंद्रात चाचणी करण्याची सुविधा असेल. या चाचणीची सर्व माहिती प्रशासनाकडे असेल. कोकणात येताच प्रत्येक रेल्वे, एसटीतून येणाऱ्या प्रवाशांचे नाव, मोबाईल क्र मांक यासह सर्व यादी चालक, वाहक आणि रेल्वेडून तेथे उपस्थित संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात येईल. त्यामुळे कोकणात आलेल्या प्रवाशांनी चाचणी न केल्यास त्याची माहिती त्वरीत उपलब्ध होईल आणि त्या व्यक्तीची गावात जाऊन ग्रामकृती दलाकडून चाचणीही होईल, असे रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी सांगितले.

खासगी वाहनाने कोकणात जाणाऱ्यांनाही कोरोना चाचणीला सामोरे जावे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातही हाच नियम लागू आहे.जिल्ह्यांच्या प्रवेशद्वारावर आरटीओ, पोलीस किंवा संबंधित कर्मचाऱ्यांकडून कोरोना चाचणी अहवाल किंवा लसीकरण प्रमाणपत्र तपासले जाईल. तिथे करोना चाचणीचीही सुविधा असेल. खासगी वाहनाने कोकणात जाणाऱ्यांनाही कोरोना चाचणीला सामोरे जावे लागेल. ग्रामकृतीदलामार्फत चाचणीची सुविधा उपलब्ध असेल. कोरोनाबाधित आढळल्यास संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्घाटनाला डेअरिंगबाज माणूस हवा म्हणून शहांना बोलावलं”, राणेंचं डेरिंगबाज उत्तर

News Desk

राज्यात पुन्हा कडक निर्बंध; विवाह सोहळा ५०, तर अंत्यसंस्काराला २० लोकांना परवानगी

Aprna

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात राजीनामा देणार?

News Desk