मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर आता मुंबई आणि बिहार पोलिस यांच्यात संघर्ष सुरु झाला आहे. सुशांतने आत्महत्या मुंबईत केली मात्र बिहार पोलिसांकडे सुशांतच्या वडिलांनी एफआयआर दाखल केल्यानंतर या प्रकरणाला एक वेगळेच वळण मिळाले. यावरुनच मुंबई पोलिस आयुक्त परम बीर सिंग यांनी आज (३ ऑग्सट) पत्रकार परिषद घेत याविषयी महत्वाची माहिती दिली.
There is no question of non-cooperation, we are legally examining whether they (Bihar police) have jurisdiction or not in #SushantSinghRajputCase. Still, if they've got jurisdiction then they should prove it: Mumbai Police Commissioner on Bihar police's claim of non-cooperation pic.twitter.com/E8pyrwm0BL
— ANI (@ANI) August 3, 2020
सुशांतने १४ जूनला मुंबईच्या राहत्या घरी आत्महत्या केली. आणि त्याच्या घरी आत्महत्येपूर्वी पार्टी झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, अशी कोणतीही पार्टी झाले नसल्याचे परम बीर सिंग यांनी सांगितले. त्यांनी जे सीसीटीव्ही फुटेज पाहिले त्यात असे काहीही आढळले नसल्याचे त्यांनी सांगितले. जाणून घेऊयात आणखी काही महत्त्वाचे मुद्दे –
No politician's name came up during the investigation. There is no evidence against any politician from any party: Param Bir Singh, Mumbai Commissioner of Police on #SushantSinghRajputDeathCase pic.twitter.com/gnDbuJkM6o
— ANI (@ANI) August 3, 2020
१. सुशांत मृत्यू प्रकरणी आतापर्यंत ५६ लोकांचे जबाब नोंदवले गेले आहेत. व्यावसायिक वैर, आर्थिक व्यवहार किंवा आरोग्य अशा सर्व मुद्द्यांवरून तपास सुरू आहे.
#RheaChakroborty was one of the 56 people questioned by Mumbai police. Her statement was recorded twice & she was called to the police station several times. I can't comment about her whereabouts: Param Bir Singh, Commissioner of Police, Mumbai on #SushantSinghRajputDeathCase
— ANI (@ANI) August 3, 2020
२. सुशांत bipolar disorder या मानसिक आजाराने त्रस्त होता आणि त्यासाठी तो उपचार घेत असल्याचं समोर आले आहे.
३. कोणत्या कारणामुळे त्याचा मृत्यू झाला हा आमच्या तपासाचा विषय आहे, आणि त्याचा तपास सुरु आहे.
Bihar Police FIR says Rs 15 cr were siphoned off from Sushant's account. During the probe, we found he had Rs 18 cr in his account of which around Rs 4.5 cr are still there. Till now no direct transfer to Rhea Chakraborty's account found, still probing: Mumbai Police Commissioner pic.twitter.com/GaX1AJad69
— ANI (@ANI) August 3, 2020
४. १६ जून रोजी सुशांतचे वडील, बहीण आणि मेहुण्याचा जबाब नोंदवला गेला. त्यावेळी सुशांतच्या कुटुंबीयांनी आमच्या तपासाबद्दल कोणतीच शंका उपस्थित केली नव्हती. आमच्या तपासात काही त्रुटी असल्याची तक्रारसुद्धा त्यांनी केली नव्हती.
५. सुशांतच्या मृत्यू प्रकरणी मुंबई पोलिसांनी जबाब नोंदवलेल्या ५६ लोकांमध्ये रिया चक्रवर्तीचाही समावेश आहे.
६. रियाचा जबाब दोन वेळा नोंदवला गेला. तिला पोलीस ठाण्यातही अनेकदा बोलावलं गेलं.
७. ती आता कोठे आहे, याबाबत मी वक्तव्य करू शकत नाही.
८. बिहार पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार सुशांतच्या खात्यातून १५ कोटी रुपये काढून घेण्यात आले.
९. सुशांतच्या खात्यात १८ कोटी रुपये होते आणि त्यापैकी साडेचार कोटी रुपये अजूनही खात्यात आहेत, असे आमच्या तपासात निदर्शनास आले आहे. सुशांतच्या अकाऊंटमधून रियाच्या अकाऊंटमध्ये थेट पैसे ट्रान्सफर झाल्याची कोणतीही माहिती समोर आली नाही. याबाबत अजून तपास सुरू आहे, अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.