HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

पार्थ पवार ‘सिल्व्हर ओक’वर सुप्रिया सुळे अन् शरद पवारांच्या भेटीला

मुंबई | उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे सिल्व्हर ओक बंगल्यावर सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले आहेत. “पार्थ पवार हे अपरिपक्व आहेत, त्यांच्या मताला कवडीची किंमत नाही”, असे वक्तव्य शरद पवार यांनी काल (१२ ऑगस्ट) केले होते. शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बैठकांची मालिका सुरू झाली. शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर काल सिल्व्हर ओकवर शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात बैठक झाली. मात्र, ही बैठक आधीच ठरली होती आणि पवार कुटुंबात सर्व काही ठीक असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांना दिली होती.

दरम्यान आज (१३ ऑगस्ट) दुपारीही सुप्रिया सुळे यांनी मंत्रालयात जाऊन अजित पवार यांची भेट घेतली. काही वेळ या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. मतदारसंघाच्या कामासाठी सुप्रिया सुळे अजित पवारांना भेटल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले आहे. शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर अजित पवार, पार्थ पवार किंवा सुप्रिया सुळे यांच्यापैकी कोणीच अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, आता पार्थ यांच्या या भेटीनंतर ते काय प्रतिक्रिया देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Related posts

शिवसेना आणि काँग्रेस कार्यकर्ते भिडले

News Desk

भिवंडी इमारत दुर्घटनेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवारांना दु:ख

News Desk

अभिनेता सुबोध भावे आणि त्याच्या कुटुंबियांना कोरोनाची लागण

News Desk