HW News Marathi
महाराष्ट्र

पार्थ तुम्ही जन्मजात लढवय्ये !, राणा जगजितसिंहांचे पुत्र मल्हार पाटलांकडून पाठराखण 

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र आणि आपले नातू पार्थ पवार यांना कठोर शब्दांत फटकारले आहे. राजकीय वर्तुळात शरद पवारांच्या एका विधानाने खळबळ उडवून दिलेली असताना आता माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचे नातू मल्हार पाटील यांनी पार्थ पवारांना आपले समर्थन दिले आहे. “तुम्ही जन्मजात लढवय्ये आहात. मला तुमचा अभिमान आहे”, अशा शब्दांत मल्हार पाटील यांनी पार्थ पवारांची पाठराखण केली आहे.

“तुम्ही जन्मजात लढवय्ये आहात. मी लहानपणापासून तुम्हाला पाहिले आहे. मला तुमचा अभिमान आहे. आपण उस्मानाबादचे आहोत. झुंज कशी द्यायची हे आपल्याला माहित आहे”, असे म्हणत मल्हार पाटील यांनी पार्थ पवारांकरिता एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. त्याचप्रमाणे, आपली ही पोस्ट कोणत्याही राजकीय हेतूने नसून केवळ पार्थ पवारांच्या प्रेमापोटी आणि त्यांच्याबद्दल वाटणाऱ्या आपुलकीपोटी आहे असेही मल्हार पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

कोण आहेत मल्हार पाटील ?

मल्हार पाटील हे माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचे नातू आणि भाजपचे उस्मानाबादचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे पुत्र आहेत. पद्मसिंह पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि पार्थ पवार यांच्या आई सुनेत्रा पवार यांचे बंधू आहेत. खरंतर मल्हार पाटील आणि पार्थ पवार यांचे काका-पुतण्याचे नाते आहे. मात्र, दोघांचेही वय जवळपास सारखेच असल्याने या दोघानांचीही चांगली मैत्री आहे. गेल्याच वर्षी पद्मसिंह पाटील यांच्या कुटुंबाने राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादीला मोठा दणका बसला होता.

राणा जगजितसिंहपाटील म्हणजे बालबुद्धी | शरद पवार

पद्मसिंह पाटील यांच्या कुटुंबाने राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर, सप्टेंबर २०१९ मध्ये उस्मानाबादमधील पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी पद्मसिंह पाटील आणि राणाजगजितसिंह पाटील यांना नाव न घेता फैलावर घेतले होते. “आज विकासाच्या नावाचा घोष करता पण एवढी वर्ष सर्व तुमच्या हातात दिलं होतं तेव्हा काय केले ?” असा संताप व्यक्त करत त्यावेळी शरद पवारांनी चक्क राणा जगजितसिंह पाटील यांचा उल्लेख “बालबुद्धी” असा केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईसह राज्याच्या ग्रामीण भागात लवकरच महिलांसाठी अत्याधुनिक व अद्ययावत फिरता दवाखाना – राजेश टोपे

News Desk

पत्रकार अर्णब गोस्वामींवर तातडीने कारवाई करण्यासाठी अरविंद सावंतांचे गृहमंत्र्यांना पत्र

News Desk

फडणवीसांनी खालच्या स्तरावर राजकारण केलं, खडसेंचा गंभीर आरोप

News Desk