HW News Marathi
महाराष्ट्र

जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन द्या, ‘सेजस’तर्फे मागणी

रत्नागिरी | “जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना यापुढे तरी किमान दर महिन्याला वेळेवर वेतन द्या”, अशी मागणी ‘सेजेस’च्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.इंद्रायणी जाखड यांच्याकडे केली आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या औषधोपचारासह अन्यही काही आवश्यक खर्चासाठी पैशांची आवश्यकता असते. मात्र, जिल्हापरिषदेमार्फत निवृत्त कर्मचाऱ्यांना आपले वेतन वेळेवर मिळत नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर ‘सेजेस’च्या पदाधिकाऱ्यांकडून त्यासाठीची मागणी करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील रस्ता कामगारांची मे, जून महिन्यात येणारे निवृत्त वेतन अद्यापही मिळालेले नाही. अनुदान उपलब्ध झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना त्यांचे निवृत्ती वेतन दिले जाईल, असे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले आहे. ‘सेजस’ अधिकाऱ्यांनी ही बाब मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. ‘सेवानिवृत्तांची जनसेवा समिती’चे अध्यक्ष सुरेंद्र घुडे, उपाध्यक्ष वसंत झगडे, सचिव दिगंबर कुलकर्णी, खजिनदार विजय बिर्जे, सहसचिव विलास जोशी, सदस्य विजय भाटकर,विश्वनाथ कवठणकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सतीश उकेंना घेऊन ईडीचे पथक मुंबईत दाखल

News Desk

आमोद्यात दहा मोरांचा मृत्यू, वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून घटनेचा पंचनामा

Aprna

BSNLच्या 4G अपग्रेडेशनसाठी काढलेल्या निविदा दूरसंचार मंत्रालयाने केल्या रद्द

News Desk