HW News Marathi
महाराष्ट्र

अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाला जनादेश मिळाला आहे !

मुंबई | “अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाला जनादेश मिळाला आहे,” असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. राऊत पुढे म्हणाले की, शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम असून महाराष्ट्रतील शिवसेनेच्या सर्वं आमदारांनी एकमुखाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेना पाठिंबा दिला आहे. युती तोडाण्याचे पाप उद्धव ठाकरे करणार नाही, असा विश्वास राऊतांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे. “भाजपने राज्यापालांची भेट घेऊनही सरकार स्थापन केले नाही,” असा उलट सवाल राऊतांनी भाजपला यावेळी केला आहे.

शिवसेना ही मुख्यमंत्री पदाच्या भूमिकेवर ठाम आहे. मात्र, भाजप त्यांच्या भूमिकेवर ठाम आहे का?, असा टोलाही राऊतांनी भाजपला लगावला. “साम, दाम, दंड आणि भेद हा सत्तेचा माज असलेलेच वापरतात,” अशा शब्दात राऊतांनी आज (७ नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत भाजपवर टीका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा कार्यकाळ ८ नोव्हेंबर संपणार आहे. त्यामुळे धमक्या ब्लॅकमेलिंग, पोलिसी बळाचा वापर चालणार नाही, असा इशारा राऊतांनी भाजपला दिला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालात बहुमत मिळूनही सरकार स्थापन करू शकत नाही. याचा अर्थ असा होतो की, “भाजपला बहुमत मिळविण्यास अपयश आले आहे. त्यामुळे भाजपकडे बहुमत नसेल तर सरळ सांगा,” असे आवाहन राऊतांनी भाजपला केला आहे. भाजपकडून राज्यात राष्ट्रपती राजवट लादण्याचे पाप करत असल्याचे राऊतांनी पत्रकार परिषदेते सांगितले आहे.

संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

  • अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव आला तर बोलणी सुरू होतील
  • ‘ठरल्या प्रमाणे करा’ असा आमचा एका ओळीचा प्रस्ताव आहे
  • आमच्याकडे पर्याय आहे, त्याशिवाय आम्ही बोलत नाही
  • आमच्याकडे पर्याय आहे, त्याशिवाय आम्ही बोलत नाही
  • संख्याबळ झालेलं आहे, ते आम्ही सभागृहात दाखवू
  • शिवसेना आशेवर नाही तर आत्मविश्वासावर जगते
  • महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवणारच
  • सत्तेची हवस सोडून द्या आणि सांगा की आम्ही सत्ता स्थापू शकत नाही
  • सगळ्यात मोठा पक्ष असूनही भाजप सत्ता स्थापन करत नाही याचा अर्थ हा होतो की ते संख्याबळ जमवू शकलेले नाही
  • शिवसैनिक असेल असं म्हणत असाल तर शिवसैनिकाप्रमाणे दिलेला शब्द पाळा, शिवसैनिक नेहेमी सत्याच्या मार्गावर चालतो, तो चुकीच्या मार्गावर चालत नाही
  • शिवसैनिक असेल असं म्हणत असाल तर शिवसैनिकाप्रमाणे दिलेला शब्द पाळा, शिवसैनिक नेहेमी सत्याच्या मार्गावर चालतो, तो चुकीच्या मार्गावर चालत नाही
  • देवेंद्र फडणवीस हे शिवसैनिकच आहेत असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते, त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की ‘उपमा, अलंकार वापरून राजकारण होत नाही’
  • साम,दाम.दंड,भेद हा व्यक्तीचा नाही तर सत्तेचा असतो
  • आता कोणतेही घटनाविरोधी कृत्य, दबाव, धमक्या चालणार नाही
  • 2014 सालची परिस्थिती आणि आताची परिस्थिती यात फरक आहे
  • त्यांनी सांगितले की जनादेश महायुतीला मिळाला आहे, असं असेल तर मग सत्तास्थापनेचा ते दावा का सादर करत नाही ?

    राजभवनाबाहेर चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांची पत्रकार परिषद ऐकली

  • 24 तारखेला निकाल लागल्यावर उद्धव ठाकरेंनी हेच सांगितले, विधीमंडळ पक्षनेता निवडीमध्ये देखील हेच सांगितले की युती तुटेल असे मी काहीच करणार नाही
  • अस्थिरता ज्यांच्यामुळे निर्माण होते आहे ते महाराष्ट्राचे नुकसान करीत आहे
  • जो निर्णय उद्धव ठाकरे घेतील तो आम्हाला मान्य असेल असे आमदारांनी सांगितले
  • शिवसेनेच्या सगळ्या आमदारांनी एकमुखाने उद्धव ठाकरेंच्या भूमिकेला पाठिंबा दिला
  • भाजप त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत का हा त्यांना प्रश्न विचारा
  • शिवसेना आणि उद्धव ठाकरे नेहेमी भूमिकेवर छाम राहिलेले आहे
  • शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पर्यटनवाढीसाठी आराखडा तयार करुन प्रभावी अंमलबजावणी करा! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

बीड जिल्ह्यातील विकास कामाच्या मुद्यावरून पुन्हा एकदा मुंडे बहीण भावात जुंपली!

News Desk

धक्कादायक ! राज्यपाल सचिवालयाकडे विधानपरिषदेच्या राज्यपालनियुक्त १२ सदस्यांची यादीच नाही

News Desk