HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवार यांना समजून घ्यायला लोकांना १०० जन्म लागतील !

नवी दिल्ली | “शरद पवार यांना समजून घ्यायला लोकांना १०० जन्म लागतील,” असा विश्वास शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी दिल्लीत आज (१९ नोव्हेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवर टीका केले आहे. शिवसेनेला पाठिंब्यात निर्णय झाला नाही, असे काल (१८ नोव्हेंबर) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

राऊत पुढे म्हणाले की, “मला शरद पवारांवर अजिबात शंका नाही, डिसेंबरआधी आम्ही सरकार स्थापन करु, असा दावा देखील त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे. “भाजपच्या मुंबईतील नेत्याने मध्यंतरी असे म्हटले की, नरेंद्र मोदी यांना समजून घ्यायला संजय राऊतांना २५ जन्म लागतील. तसेच मी या देशातल्या सगळ्यांना सांगू इच्छितो, माननीय शरद पवार यांना समजून घ्यायला १०० जन्म लागतील,” असे म्हणत राऊतांनी भाजपचे नेते आशिष शेलार यांच्यावर निशाणा निशाणा साधला.

“शरद पवार यांचा समाजकारण आणि राजकारणातील अनुभव मोठा आहे. त्यामुळे ते जे बोलत आहेत ते बरोबरच आहे. शरद पवार यांना विरोधात बसण्याचेच जनमत मिळाले आहे आणि आम्ही स्वतंत्र लढलो आहे. मात्र, आता स्थिर सरकारसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत,” असेही राऊतांनी पत्रकारांशी बोलताना नमूद केली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘तो’ निर्णय राज्य सरकारनं घ्यावा – विनोद पाटील

News Desk

दिवाळीनंतर मंदिरे उघडण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संकेत 

News Desk

‘लायकीत राहायचं नाहीतर पुण्यात फिरणे मुश्किल करू’, प्रविण गायकवाडांना मनसेचा थेट इशारा!

News Desk