HW News Marathi
देश / विदेश

पेट्रोलने गाठली शंभरी ! ‘या’ कारणामुळे पंपचालकांनी थांबवली विक्री

मुंबई । कोरोना काळात आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले असताना इंधनाच्या चढत्या दरांचा देखील फटका बसणार आहे.कारण, सरकारी तेल कंपन्यांकडून आज (१४ फेब्रुवारी) सलग ६ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे, पेट्रोलच्या किंमतीने आता ‘शंभरी’ गाठली आहे. प्रीमियम पेट्रोलचा दर हा प्रति लीटर तब्बल १०० रुपयांच्या पार गेला आहे.

पेट्रोलचे दर १०० पार गेले असले तरीही अनेक पेट्रोल पंपावर असलेल्या जुन्या मशीनमध्ये ३ डिजिट दाखवले जात नाहीत. त्यामुळेच आता अनेक पेट्रोल पंपावर पंपचालकांकडून प्रीमियम पेट्रोलची विक्री बंद करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, १०० पार गेलेल्या पेट्रोलच्या किंमतींमुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसणार आहे.

पेट्रोलचे भाव वाढल्यानंतर काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती. मात्र, पेट्रोलियम उत्पादनांवर उत्पादन शुल्क कमी करण्याबाबत सध्या कोणताही निर्णय अथवा विचार नसल्याचे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी संसदेत सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्र सरकारचे एक पाऊल मागे

News Desk

केंद्र सरकारने महाराष्ट्राचा गौरव केला त्याला आज १० वर्ष पूर्ण !

News Desk

‘अमरावतीतल्या हवाई सुंदरी श्वेता शंकेची धाडसी कामगिरी’, सर्वत्र कौतुकाचा वर्षांव!

Ruchita Chowdhary