मुंबई | एकीकडे कोरोनाने संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. सध्या देशात कोरोनाबाधितांचा आकडा ५७० असून महाराष्ट्राचा आकडा ११२ झाला आहे. परंतु, आज (२५ मार्च) गुढीवाडव्याच्या दिवशी राज्यातील लोकांना एक आनंदाची बातमीही मिळाली आहे. पुण्यात ज्या पहिल्या दाम्पत्याला कोरोनाची लागण झाली होती त्या दोघांची दुसरी कोरोना चाचणी निगटिव्ह आली असून त्यांना आज डिस्चार्ज देण्यात येणार आहे. तसेच, या पाडव्याच्या दिवशी अनेक राजकीय नेत्यांनी ट्विटरवरुन नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरोना संकटावर मात करण्यासाठी गुढीपाडव्यानिमित्त या नववर्षाला ‘कोरोनामुक्त भारताचा’ संकल्प करू या ! अशा शुभेच्छा दिल्या आहेत.
गुढीपाडवा हा नव्या आशा-आकांक्षांचा, नवसंकल्पांचा सण आहे. कोरोना संकटावर मात करण्यासाठी गुढीपाडव्यानिमित्त या नववर्षाला ‘कोरोनामुक्त भारताचा’ संकल्प करू या! आरोग्याची आणि संरक्षणाची गुढी उभारून हा सण घरीच साजरा करू या!
सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! pic.twitter.com/wdBwJVgc4k— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 25, 2020
खासदार सुप्रिया सुळे यांनीही हा सण घरातच थांबून कुटुंबीयांसोबत आनंदाने साजरा करा.घरात असा, सुरक्षित राहण्याचे आवाहन लोकांना केले आहे.
मराठी नववर्षाच्या अर्थात गुढीपाडवा सणाच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष आपणांस सुखसमृद्धीचे जावे ही शुभकामना. हा सण घरातच थांबून कुटुंबीयांसोबत आनंदाने साजरा करा.घरात असा, सुरक्षित राहा. pic.twitter.com/BAnWtAU7bX
— Supriya Sule (@supriya_sule) March 25, 2020
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्त्यावर उतरू नये, गर्दी टाळा ! ‘कोरोना’विरोधात जनजागृती करण्याची, ‘कोरोना’ला हरवण्याच्या संकल्पाची गुढी उभारा, असे आवाहन त्यांनी केले.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक 'गुढीपाडवा' या मंगलमय दिनाच्या आणि मराठी नूतन वर्षाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! यंदाचा गुढीपाडवा घरात थांबूनच साजरा करावा. रस्त्यावर उतरू नये, गर्दी टाळा! ‘कोरोना’विरोधात जनजागृती करण्याची, ‘कोरोना’ला हरवण्याच्या संकल्पाची गुढी उभारा, असं आवाहन करतो. pic.twitter.com/tbWCiPDscR
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) March 25, 2020
आज हिंदु नववर्षाचा प्रारंभ होत असून घरोघरी आरोग्याची, सुरक्षिततेची गुढी उभारावी. स्वंयशिस्त व सहकार्यातून संकटावर मात करून हे संकट हद्दपार करण्याचा संकल्प या निमित्ताने करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
आज हिंदु नववर्षाचा प्रारंभ होत असून घरोघरी आरोग्याची, सुरक्षिततेची गुढी उभारावी. स्वंयशिस्त व सहकार्यातून संकटावर मात करून हे संकट हद्दपार करण्याचा संकल्प या निमित्ताने करण्याचे आवाहन करून मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी राज्यातील जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 25, 2020
कोणीही रस्त्यावर उतरू नका. सामूहिक आयोजन, भेटीगाठी करू नका. घरी राहूनच हा लढा यशस्वी करण्याच्या संकल्पाची गुढी सर्वजण उभारूयात असे आवाहन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.
कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता बीड जिल्ह्यासह राज्यात लागू असलेल्या संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करत यावर्षीचा #गुढीपाडवा घरी राहूनच साजरा करावा, कोणीही रस्त्यावर उतरू नका. सामूहिक आयोजन, भेटीगाठी करू नका. घरी राहूनच हा लढा यशस्वी करण्याच्या संकल्पाची गुढी सर्वजण उभारूयात. pic.twitter.com/7Kd0x2ZgDQ
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) March 25, 2020
गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
कोरोना मुक्तीच्या संकल्पाने नववर्षाचे स्वागत करूया,
यावर्षीचा गुढीपाडवा, घरात राहून साजरा करूया..
कोरोनाचा नायनाट करण्यासाठी सुरक्षेचे नियम पाळूया,
गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळून आरोग्याची काळजी घेऊया!गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! pic.twitter.com/2Zv6vWCjXa
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) March 25, 2020
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही गुढीपाडव्याच्या सर्व नागरिकांना ह्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने ह्या संकटाच्या छायेची तीव्रता कमी कमी होत सर्वत्र पुन्हा एकदा आरोग्याचं, भरभराटीचं वातावरण येवो अशा शुभेच्छा दिल्या.
'वसुधैव कुटुम्बकम' अर्थात वैश्विक कुटुंबाच्या ह्या काळात संपूर्ण जग एकत्रितपणे एका संकटाशी झुंज देत आहे. ह्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने ह्या संकटाच्या छायेची तीव्रता कमी कमी होत सर्वत्र पुन्हा एकदा आरोग्याचं, भरभराटीचं वातावरण येवो, हीच सदिच्छा.#गुढीपाडवा pic.twitter.com/fK4wnBAebA
— Raj Thackeray (@RajThackeray) March 25, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.