HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

भाजप खासदार रामदास तडस यांच्याविरुद्ध ‘त्या’ प्रकरणी वर्धा पोलिसांत गुन्हा दाखल

वर्धा | वर्ध्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांना शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी आमदार रणजित कांबळे यांना अटक करण्याच्या मागणीसाठी भाजपाचे खासदार रामदास तडस यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत करोना नियमांचं उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप असून, याप्रकरणी खासदार तडस यांच्यासह आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्ध्यातील रामनगर पोलिसांत हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

खासदार तडस काय म्हणाले होते?

“आमदार कांबळे यांनी यापूर्वीही अनेक अधिकाऱ्यांना धमकावलं आहे. परंतु एकाही अधिकाऱ्याने तक्रार न केल्यानं कांबळेंची हिंमत वाढली. अनेक अधिकारी विनंतीवर बदली करून घेत जिल्हा सोडून गेले. मात्र, डॉ. डवले यांनी हिंमत दाखवून पोलीस तक्रार केली. या तक्रारीची तत्काळ दखल न घेतल्यास आरोग्य यंत्रणा नाराज होऊ शकते. याचा विपरित परिणाम लोकांच्या आरोग्यावर झाल्यास कांबळे हेच जबाबदार असतील. त्यामुळे कांबळे यांना अटक करावी,” अशी मागणी तडस यांनी केली होती.

काय आहे प्रकरण?

वर्धा जिल्ह्यातील नाचन गाव येथे ९ मे ला आरटीपीसीआर चाचणी आरोग्य शिबीर पार पडलं. या शिबिराची छायाचित्रं काढून स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राजकीय व्हॉट्स अॅप ग्रुपवर टाकली होती. हे फोटो दिसल्यानंतर आमदार कांबळे यांनी डॉ. डवले यांना फोन केला. फोनवरून घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केली. तसेच जीव मारण्याची धमकी दिली.

“तुला चप्पलेनं मारणार, तु मला भेट आता… तुला चप्पलेनं मारला नाही, तर माझं नाव रणजित नाही. तुला जर वाटत की कलेक्टर आणि एसपी तुला वाचवणार, तर तुला पोलीस स्टेशनमध्ये मारणार, अशी शिवीगाळ केली. तसेच तालुका अधिकाऱ्यांनाही कांबळे यांनी धमकावलं आहे,” असा आरोप डॉ. डवले यांनी केला होता.

Related posts

फडणवीसांची लोकप्रियता ठाकरे सरकारला खुपते म्हणूनच आकसबुद्धीने ‘हा’ निर्णय घेतला | पडळकर

News Desk

महाराष्ट्राला कोरोना लसींचा पुरवठा करण्यास केंद्राकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ !

News Desk

वज्रेश्वरी देवीच्या मंदिरात चोरी, आज दर्शनासाठी मंदिर बंद

News Desk