HW News Marathi
महाराष्ट्र

बीड जिल्ह्यातील परळी शहर पोलिसांची पाकिस्तान बॉर्डरवर मोठी कारवाई

बीड | बीड जिल्ह्यातील परळी शहरच्या पोलिसांनी पाकिस्तान बॉर्डरवर जाऊन केली मोठी कारवाई आहे. एक वर्षापूर्वी परळी शहरातील एका व्यापाऱ्याला कमी दरात सोने देतो म्हणून चाळीस लाखांची फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींच्या पाकिस्तान बॉर्डरवर पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. परळी शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भार्गव सपकाळ व डीबी शाखेचे भास्कर केंद्रेंनी गुजरातमधील भुज कच्छच्या जंगलात जाऊन आरोपीला अटक केले आहे. परळ पोलिसांच्या या कारवाईमुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. गेल्या वर्षापूर्वी एक व्यापारी शंकर शहाणे यांना गुजरात मधील भुज कच्छ या ठिकाणी राहत असलेला एक चतुर महाठक जीसूप मोहम्मद अली कक्कळ आणि सिकंदर ह्या दोघांनी सुरुवातीस स्वस्त दरात सोने देतो म्हणून पाच लाखांचे सोने दिले यावर शंकर शहाणे यांचा त्यांच्यावर विश्वास बसला. यावेळी व्यवहार करताना जीसूप कक्कळ याने आपले नाव बदलून अब्बास आली अशा नावाचा वापर केला होता. ठरल्याप्रमाणे जिसुप कक्कळने शंकर शहाणे यांना ठरल्याप्रमाणे पाच लाखांचे सोने दिल्यामुळे त्यांचा त्याच्यावर विश्वास बसला आणि नंतर जिसुप कक्कळने आणखी स्वस्तात सोने देतो म्हणून शंकर शहाणे यांच्याकडून नगदी रोख चाळीस लाख घेऊन गेला. ४० लाख घेऊन गेल्यानंतर जवळपास सहा महिने जीसुप हा शंकर शहाणेंना सोने न देता टाळाटाळ करत राहिला. कोरोनाचा काळ आहे. आज, उद्या, सोने देतो म्हणून टोलवाटोलवी करीत राहिला. जिसुप कक्कळ व सिकंदर आपली फसवणूक करीत आहे. हे लक्षात येताच शंकर शहाणे यांनी १ वर्षापूर्वी शहर पोलीस ठाण्यात जावून गुन्हा दाखल झाला होता.

गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी जिसुप कक्कळ आणि सिकंदर यांच्या मागावर होती. व्यवहार करताना जिसुप कक्कळने आपले नाव बदलून अब्बास आली असे नाव ठेवल्यामुळे पोलिसांना त्याचा शोध घेण्यास अनेक अडचणी येत होत्या. आरोपींच्या शोधात शहर पोलीस ठाण्याचे पथकाने मुंबई, नागपूर, अमरावती, बुलढाणा, भोकरदन, सोलापूर आदी प्रमुख भागात शोध घेतला. मात्र, आरोपींचा शोध लागत नाही. मात्र पोलीस अधीक्षक लांजेवार, अतिरिक्त पोलिस अधीक्षक कविता नेरकर, पोलीस उपाधीक्षक सुनील जायभाय व शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भार्गव सपकाळ डीबी शाखेचे भास्कर केंद्रे, गोविंद भताने, श्रीकांत राठोड यांनी कोणत्याही परिस्थितीत आरोपी शोधण्याचा चंग बांधला आणि थेट मुंबई गाठली. त्याठिकाणी जंग जंग पछाडले एका खबऱ्याकडून हा आरोपी त्याचं मूळ नाव जीसूप कक्कळ असून तो पाकिस्तान बॉर्डर वरील भुज‌ कच्छ भागातील जंगला लगत राहतो, अशी माहिती पोलिसांना मिळाली.

दरम्यान, साहाय्यक पोलीस निरीक्षक भार्गव सपकाळ, भास्कर केंद्रे गोविंद भताने व श्रीकांत राठोड यांनी आपला मोर्चा भूज कच्छ कडे वळवला. परळ पोलिसांनी गुजरात पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आरोपींची विचारपूस केली, असता त्यांनी सांगितले की, हे आरोपी फार खतरनाक असून त्यांच्यापर्यंत पोहोचणे इतके सोपे नाही. त्यांच्या आपसातील दोन गटाच्या भांडणांमध्ये १४ खून झाल्याची माहिती त्यांनी मिळाली होती. त्यामुळे तुम्ही त्यांना घेऊन जाण्याच्या फंदात पडू नका परत फिरणार नाहीत. तरीही गुजरातच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्याला भीख न घालता भार्गव सपकाळ आणि भास्कर केंद्रे यांनी तपासाची चक्रे तेज करीत आरोपी जीसूप कक्कळ हा भुज कच्छ पासून १७ किलोमीटर अंतरावरील रतिया या ठिकाणच्या फार्महाऊसमध्ये राहतो, असे समजल्या वरून त्यांनी आपला मोर्चा रतियाच्या दिशेने वळवला.

रतियापासून पाकिस्तान बॉर्डर केवळ ७० किलोमीटर अंतरावर आहे. आरोपीस पोलीस आहेत हे समजू नये म्हणून भास्कर केंद्रेंनी अक्षरशा एका मतीमंद व्यक्तीसारखे रूप धारण केले. आणि मदतीसाठी स्थानिकचे चार पोलिस कर्मचारी सोबत घेऊन आरोपीचे फॉर्म हाऊस गाठले. स्थानिक पोलिसांना आरोपीच्या बंगल्याच्या समोरचा दरवाजा वाजवण्यास सांगितले, अशात आरोपी मागच्या बाजूने जंगलात पळून जाणार म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक भार्गव सपकाळ व भास्कर केंद्रे मागच्या बाजुला जंगलात दडून बसले. झाले तसेच आरोपी जिसूप कक्कळ हा मागच्या दाराने जंगलात पळून जात असतानाच भास्कर केंद्र यांनी आरोपीच्या कानफटात रिवाल्वर लावीत मुसक्या आवळीत जेरबंद केले अशा प्रकारेच दुसरा आरोपी सिकंदर याच्याही मुसक्या आवळल्या. मुद्देमाल रोख ४० लाख रुपयांसह आरोपी मोठ्या शिताफीने ताब्यात घेत परळी आणले.आपल्या जीवावर उदार होऊन खतरनाक आरोपींच्या मुसक्या आवळून मुद्देमालासह जर बंद केल्याबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक भार्गव सपकाळ, डीबी शाखेचे भास्कर केंद्रे, गोविंद भताने, श्रीकांत राठोड यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जाणून घ्या…राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेले महत्वाचे निर्णय

Aprna

गणेश मंडळाचा उपक्रम; गणेशोत्सवात जन्मणाऱ्या मुलींना पाच हजारांची भेट

News Desk

“नवरा बायको भांडण झाल्यानंतर एकत्र चहा पितात”, ‘राड्या’वर चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य

News Desk