HW News Marathi
Covid-19

लसीकरण केंद्रावर पोलीसांसोबत हुज्जत, पोलिसांनी केलेल्या धुलाईचे दृश्य CCtVमध्ये कैद

बीड | बीड शहरातील जिल्हा रुग्णालयाच्या लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती त्या गर्दीला नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे मात्र आज सकाळी १२ वाजता या ठिकाणी गर्दीला आवरण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना शिस्तीत रांगेत बसून घेण्याचे सांगितले. मात्र यावेळी काही तरुणांनी पोलिसांशी हुज्जत घातली. यात बीडचे उप पोलीस अधीक्षक संतोष वाळके यांना काही तरुणांनी मारहाण केली. या मारहाणीत संतोष वाळके यांच्या मानेजवळ दुखापत झाली आहे.

यानंतर पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी लाठीचार्ज केला याचे दृश्य सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण झाली त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या तरुणांची चांगलीच धुलाई केली. मात्र लसीकरण केंद्रावर झालेल्या गोंधळामुळे वयोवृद्ध आणि लस घेण्यासाठी आलेल्या महिलांची तारांबळ उडाली होती. एकीकडे लसीकरण सुरळीत चालण्यासाठी प्रयत्न होत असताना दुसरीकडे लसीकरण केंद्रावरील गोंधळ आणि मारहाण यामुळे संताप व्यक्त केला जात आहे या प्रकरणात गोंधळ घालणाऱ्या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेसोबत ९ शैक्षणिक संस्थांचे सामंजस्य करार

Aprna

भाजप नेते हर्षवर्धन पाटील आणि राधाकृष्ण विखे-पाटील कोरोना पॉझिटिव्ह

Aprna

दहावीच्या परीक्षा रद्दच, मात्र बारावीच्या परीक्षा…! । वर्षा गायकवाड

News Desk