HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

आपण पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांप्रमाणे वागणार नाही ना? 

कोल्हापूर | सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यींची २०१५ साली हत्या झाली होती. अतिशय क्रुर पद्धतीने हत्या केलेल्या या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले होते. आता या प्रकरणाची चौकशी पुन्हा करण्यासाठी आश्विनी बिद्रे यांच्या ५ वीत शिकणाऱ्या मुलीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.

‘मी माझ्या आईचा शोध घ्यावा यासाठी त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर सकाळी ११ वाजल्यापासून रात्रीपर्यंत थांबले होते. त्यावेळी मुख्यमंत्रीसाहेब दिवसभर कार्यालयात होते, पण आम्हाला ते भटले नाहीत. आता बाबा बोलतात की उद्धव साहेबांना भेटायचे त्यामुळे मला ते दिवस आठवतात आणि भितीही वाटते,’ अशा आशयाचे पत्र सिद्धीने उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. ‘माझीही मुख्यमंत्र्यांना भेटायची इच्छा आहे. आपण पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांप्रमाणे वागणार नाही ना? आपण माझ्यासाठी वेळ द्याल ना? मला बोलायचं आहे’, असे भावनिक पत्र सिद्धीने उद्धव ठाकरेंना पाठवले आहे.

 

आईचा मृतदेह मिळाला पण या तपासासाठी वडीलांना (राजू गोरे) सतत न्यायालयाच्या कामासाठी मुंबईला फेऱ्या माराव्या लागतात त्यामुळे तेही भेटत नसल्याची तक्रार सिद्धीने केली आहे. वडीलांच्या जीवालाही धोका असल्याचेही तिने या पत्रात म्हटले आहे. आता मुख्यमंत्री सिद्धीच्या या पत्राला काय उत्तर देतात आणि सिद्धीच्या आईला न्याय मिळेल का ही प्रश्ने  तुर्तास तरी अनुत्तरीतच आहेत.

Related posts

तुम्ही लवकर बरे होऊन पुन्हा पहिल्यासारखे लोकांच्या सेवेसाठी मैदानात याल, असा विश्वास !

News Desk

आम्ही युतीकडे १० जागांची मागणी केली आहे !

News Desk

कुर्ल्यात महापालिकेच्या कारभाराविरोधात राष्ट्रवादीचे रास्तारोको आंदोलन

News Desk