HW News Marathi
महाराष्ट्र

मनसे कार्यकर्त्यांना Amazon ऑफीस तोडफोड पडली महागात, पोलिसांनी सुनावली कोठडी

मुंबई | मराठी भाषेचा वापर करण्यासाठी मनसेनं अॅमेझॉनविरोधात मोहीम उघडली आहे. या प्रकरणात मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांकडू धक्का देण्यात आला आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी २५ डिसेंबरला अॅमेझॉनच्या कार्यालयावर तोडफोड केली होती. त्याबाबत गुन्हा दाखल करुन पोलिसांनी आरोपींना अंधेरी कोर्टात हजर केलं. तेव्हा अंधेरी कोर्टानं मनसे कार्यकर्त्यांना १ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

अॅमेझॉनने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना न्यायालयात खेचल्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मुंबईच्या चांदिवली परिसरात असणाऱ्या अॅमेझॉनच्या गोदामाला मनसैनिकांनी लक्ष केलं होतं. अॅमेझॉनच्या वकिलांकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस पाठवण्यात आली होती. त्यानंतर संतप्त मनसैनिकांनी चांदीवलीतील साकीविहार मधल्या मारवे रोडवरील अॅमेझॉनच्या कार्यालयात जात तोडफोड केली होती.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना नोटीस

मराठी भाषेवरुन सुरु केलेल्या मोहिमेवरुन अ‍ॅमेझॉनने कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर पाच जानेवारीला कोर्टात हजर राहण्याचे आदेश राज ठाकरेंना देण्यात आले आहेत. “अ‍ॅमेझॉनसारख्या प्रतिष्ठित कंपनीने एका चांगल्या लीगल फर्मला अपॉईंट करणं अपेक्षित होतं. पण एखाद्या मूर्ख वकिलाकडून त्यांनी ते लेटर ड्राफ्ट केलं आहे. त्यांनी जी नोटीस पाठवली आहे, त्याला काहीच अर्थ नाही. त्यांनी राज ठाकरेंना नोटीस पाठवण्याचा जो प्रकार केला आहे, त्याची किंमत नक्कीच ॲमेझॉनला येत्या काळात मोजावी लागेल, असा इशारा मनसेच्या अखिल चित्रे यांनी दिला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरेंचा निरोप आला आणि फडणवीसही थांबले, कोल्हापूरात केली एकत्र पाहणी

News Desk

कॉंग्रेसची विधान परिषदेची ऑफर उर्मिला मातोंडकरने नाकारली, कॉंग्रेसचा स्फोट

News Desk

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी खासदारांना संभाजीराजे छत्रपती यांचे पत्र

News Desk