HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

हिंगणघाट जळीत कांड : पीडितेच्या मृत्यूनंतर राजकीय नेत्यांनी केले ट्विट

hinganghat woman burn case

मुंबई | हिंगणघाट जळीतकांडातील पीडित तरुणीची आज (१० फेब्रुवारी) नागपूरच्या ऑरेंज हॉस्पिटलमध्ये उपचार करताना प्राणज्योत मालवली. पीडितेच्या मृत्यूने संपुर्ण महाराष्ट्रातून तीव्र प्रतिसाद उमटत आहेत शिवाय हिंगणघाटात संतप्त ग्रामस्थांनी रास्तारोको केला आहे. या पीडितेच्या मृत्यूनंतर अनेक राजकीय नेत्यांनी ट्विटरद्वारे खंत व्यक्त करत संतप्त प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत.  खासदार सुप्रिया सुळे यांनी पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावी अशी विनंती ट्विटरद्वारे सरकारला केली.

यशोमती ठाकूर यांनी माझ्यातील आई आज सुन्न, नि:शब्द झाली आहे अशी शब्दांत हळहळ व्यक्त केली.

पंकजा मुंडे यांनी त्या अहंकारी क्रुर तरुणाला फाशी द्या अशी मागणी केली आहे.

ती आपल्यातून निघून गेली पण तिच्या मारेकऱ्याला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी राज्य शासनाकडे करणारे ट्विट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. शिवाय तिला श्रद्धांजलीही वाहिली आहे.

हिंगणघाट जळीत प्रकरणाचा निकाल लवकरात लवकर लागावा आणि तुझ्या न्यायासाठी महाराष्ट्र सोबत आहे असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

 

Related posts

सुनील तटकरेंचा ‘सेल्फी विथ खड्डा’

News Desk

बॅटने पालिका अधिकऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी आकाश विजयवर्गीयला अटक

News Desk

गोव्यात राहुल गांधींनी घेतली पर्रीकरांची भेट, राजकीय वर्तुळात रंगली चर्चा

News Desk