मुंबई | देशाला ज्या रोगाने घेरले आहे त्या कोरोना व्हायरसची सुरुवात चीनमधील वुहान हा शहरातून जगभरात पसरायला सुरुवात झाली. या रोगापसून वाचायचे असेल तर शहरातील गर्दीचे प्रमाण हे कमा व्हायला हवे. त्याच पार्श्वभूमिवर राज्य सरकारने अनेक सावधानी बाळगण्यास नागरिकांना सांगितले आहे. दरम्यान, अनेक राजकीय व्यक्तींनी देखील सोशल मीडियाद्लारे लोकांना कोरोनापासून कसा बचाव करावा, कोणती काळजी घ्यावी याची माहिती दिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विरवरुन आणि फेसबुकवरुन लोकांना कोणती काळजी घ्यावी हे सांगितले आहे. महाराष्ट्र सैनिकांनी पुढील गोष्टी करायला पाहिजेत अश्या सूचना देखील राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना या सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्या आहेत.
<iframe src=”https://www.facebook.com/plugins/post.php?href=https%3A%2F%2Fwww.facebook.com%2FRajThackeray%2Fposts%2F768651373666014&width=500″ width=”500″ height=”242″ style=”border:none;overflow:hidden” scrolling=”no” frameborder=”0″ allowTransparency=”true” allow=”encrypted-media”></iframe>
#लढाकोरोनाशी #महाराष्ट्रसैनिक #CoronaInMaharashtra #MaharashtraSainik #CoronaVirusIndia #SocialDistancing #RajThackeray pic.twitter.com/th68OupKLI
— Raj Thackeray (@RajThackeray) March 19, 2020
खासदार सुप्रिया सुळे यांनीही ट्विटरवरुन सोशल डिस्टन्सिंग म्हणजे काय याची माहिती अगदी सोप्या पद्धतीने मांडली आहे. आपण या व्हायरसशी लढत आहोत आणि आपण जिंकू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
सोशल डिस्टन्सिंग म्हणजे काय असतं ते समजावून घेऊ. आपण हे #WarAgainstVirus लढत आहोत. आपण लढू आणि जिंकू देखील.
Let's understand what is Social distancing? We will fight and win this #WarAgainstVirus.#LetsFightCorona pic.twitter.com/fmACGHQiWQ
— Supriya Sule (@supriya_sule) March 19, 2020
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही सोशल डिस्टन्सिंग म्हणजे काय हे ट्विवरद्वारे सांगितले आहे.
संसर्गजन्य आजाराचा फैलाव रोखण्यासाठी लोकांना एकमेकांच्या संपर्कात येऊ दिलं जात नाही. यालाच सोशल डिस्टन्सिंग म्हणतात!
#LetsFightCorona #coronavirusindia #COVID19 #CoronaVirusUpdate pic.twitter.com/UOagz7KEYi— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 19, 2020
सामाजिक न्याय विकास मंत्री धनंजय मुंडे यांनीही लोकांना गर्दी न करण्याचे आवाहन दिले आहे.
राज्यात #coronavirus चा प्रादुर्भाव व संसर्ग रोखण्याच्यादृष्टीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नका. अथवा गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. शासनाने दिलेल्या नियमावलीचे पालन करा. चला जबाबदार नागरिक होऊ, कोरोनावर मात करू. pic.twitter.com/ef9UvN2ApK
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) March 18, 2020
राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी लोकांना घाबरुन न जाण्याचे आवाहन केले आहे.
घाबरू नका.. पण जागरूक रहा..
कोरोना विषाणूपासून सावधानता बाळगा.#CoronaVirus #coronavirusinindia #IndiaFightsCorona #MaharashtraFightsCorona pic.twitter.com/vkSwP7HBM1— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) March 17, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.