HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यातील मंदिरे सुरू करण्यासाठी विश्व वारकरी सेवा आणि वंचित बहुजन आघाडीचे पंढरपुरात आंदोलन

पंढरपूर | राज्य सरकारने मंदिरे पुन्हा खुली करण्यासाठी आज (३१ ऑगस्ट) विश्व वारकरी सेवा आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आज पंढरपुरात आंदोलन करणार आहे. कार्यकर्त्यांनी आज सकाळी सोलापुरातील विठ्ठल मंदिर उघडले आहे. तर आंदोलनासाठी प्रकाश आंबेडकर सोलापूरहून पंढरपूरला रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत चार गाड्यांचा ताफा असून त्यात कार्यकर्ते आहेत. आंदोलनाच्या सुरुवातीला चंद्रभागा स्नान होईल, त्यांनंतर पुंडलिक दर्शन करुन प्रकाश आंबेडकर हे विठ्ठल मंदिरात प्रवेश करतील. या आंदोलनला २०० पेक्षा जास्त संघटनाचा पाठिंबा असल्याची माहिती देखील वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांनी दिली आहे.

पोलिसांच्या नाकाबंदीमुळे वारकरी आणि वंचित बहुजन आघाडीचे मोजकेच कार्यकर्ते पंढरपूरमध्ये दाखल झाल्याने एक लाख वारकऱ्यांची घोषणा हवेतच विरणार आहे. प्रकाश आंबेडकर काल काहीवेळ माळीनगर इथे थांबून सोलापूरला मुक्कामाला गेले होते. अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी काल त्यांच्यासोबत चर्चा केली होती.

पंढरपुरात सुमारे आठशे ते एक हजार कार्यकर्ते दाखल झाले आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत मोजक्या कार्यकर्त्यांना नामदेव पायरीचे दर्शन घेण्यासाठी पोलिसांनी तयारी केली आहे. प्रकाश आंबेडकर पोलिसांची विनंती कितपत आणि कशी मान्य करतात यावरच आंदोलनाची दिशा स्पष्ट होणार आहे. विठ्ठल मंदिर प्रवेश आंदोलनासाठी अनेक कार्यकर्ते पंढरपुरात दाखल झाले असून वंचितच्या कार्यकर्त्यांना पंढरपूरमधील शिवाजी चौकात रोखण्यात आले. दरम्यान, प्रकाश आंबेडकर शासकीय विश्रामगृहात पोहोचले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हिमाचल प्रदेशात दरड कोसळून ९ जणांचा मृत्यू, ३ जण जखमी

News Desk

पत्रकारावर हल्ला केल्यास तीन वर्ष शिक्षा-विधेयक मंजूर

News Desk

राज्यभरात शिवजयंतीचा मोठा उत्साह, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शिवनेरी किल्ल्यावर उपस्थित

swarit