HW News Marathi
महाराष्ट्र

“कोरोना लसीची किंमत लवकर ठरवा अन्यथा आंदोलन करु”, प्रकाश आंबेडकरांचा राज्य सरकारला इशारा

पुणे | राज्यात कोरोना लसीकरणावरुन राजकारण पेटले आहे. यात आता बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उडी घेतली आहे. “सीरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशील्ड लस ज्या देशांनी आपल्या येथून घेतली. त्या सर्वांना ३ डॉलर ते ५ डॉलरमध्ये उपलब्ध झाली आहे. मात्र आपल्याच देशात आणि पुण्यात तयार होणारी ही लस आपल्या सर्वांना जवळपास ८ डॉलर दराने घ्यावी लागत आहे. हे चुकीचे असून यातून केंद्र सरकारची भूमिका काय आहे? हे दिसून येत आहे.

या पार्श्वभूमीवर आम्ही सरकारला आठवड्याभराची मुदत देत आहोत, ही लस आम्हाला सरकारला मिळणार्‍या १५० रुपयांत मिळावी. याबाबत निर्णय जाहीर करावा, अन्यथा आम्ही आठवड्याभरानंतर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी या विरोधात आंदोलन करू.” असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी आज (२६ एप्रिल) पुण्यात पत्रकारपरिषदेत दिला आहे.

दरम्यान, कोव्हिशील्ड लशीची आधीची किंमत ‘अ‍ॅडव्हान्स्ड फंडिंग’वर आधारित होती व आता आपल्याला लशीचे उत्पादन करण्याची क्षमता वाढवण्यासाठी गुंतवणूक करायची आहे असे सांगून, या लशीची किंमत आधीच्या किमतीपेक्षा दीडपट ठेवण्याचे देशात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या करोना प्रतिबंधक लशीचे उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने समर्थन केले आहे.

आपल्या पुणे येथील केंद्रात अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या कोव्हिशील्ड लशीचे उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटने या आठवड्याच्या सुरुवातीला लशीची किंमत प्रत्येक मात्रेसाठी ६०० रुपये आणि राज्य सरकारांसाठी, तसेच केंद्र सरकारच्या नव्या करारासाठी ४०० रुपये अशी जाहीर केली होती. सध्या ही कंपनी केंद्र सरकारला विद्यमान पुरवठ्यासाठी प्रत्येक मात्रेला १५० रुपये आकारत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात ‘पाणलोट विकास घटक २.०’ योजना राबविण्याबाबत काटेकोर नियोजन करण्याचे शंकरराव गडाख यांचे निर्देश

Aprna

विंदांच्या जन्मशताब्दी निमित्ताने….!

News Desk

हंगामी अध्यक्ष पदावरून काँग्रेस-भाजप-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चुरस

News Desk