HW News Marathi
Covid-19

किर्तन, भजनासाठी मंदिरे खुली करण्यासाठी ३१ ऑगस्टला पंढरपुरात आंदोलन, वंचितचा आंदोलनाला पाठिंबा

मुंबई | राज्यात लॉकडाऊनमूळे सर्व धार्मिक स्थळे बंद आहेत. मात्र, ती पुन्हा सुरु करावी अशी मागणी पुजारी तर करत आहेतच मात्र काही राजकीय नेते देखील मागणी करत आहेत. यावरुनच आता वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे ३१ ऑगस्टला पंढरपुरात केल्या जाणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा देणार आहेत. या आधीही त्यांनी लॉकडाऊन पुर्णपणे उघडावा यासाठी डफली बजाओ आंदोलन केले होते. आणि पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता.

दरम्यान, “माणसांचं आयुष्य कैद करणाऱ्या सक्तीच्या लॉकडाऊनला आम्ही सातत्याने विरोध करत आहोत. अशातच आता महाराष्ट्रातल्या हरी भक्त पारायण महाराज व विश्व वारकरी सेनेने किर्तन, भजनासाठी मंदिरे खाली करण्यासाठी ३१ ऑगस्टला पंढरपुरात आंदोलनाची भूमिका घेतली आहे. या आंदोलनाला मी स्वत हजर राखून पाठिंबा देणार आहे”, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

https://www.facebook.com/225953357432863/posts/3681883321839832/

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“या बिझनेसमनला एखाद्या कोविड रुग्णालयात जायला सांगा”,उर्मिला मातोंडकर रामदेव बाबांवर संतापली

News Desk

जाणून घ्या…पुण्यात आजपासून काय सुरू, तर काय बंद असणार ?

News Desk

कोरोनाशी लढण्यासाठी RBI च्या महत्त्वाच्या घोषणा ..

Arati More