नवी दिल्ली | देशात कोरोना संक्रमणानं पुन्हा एकदा वेग घेतलेला दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रातून समोर येत आहेत. याच दरम्यान केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्र सरकारवर बेजबाबदारपणाचा आरोप केला आहे. राज्याला पुरवण्यात आलेल्या लसीच्या डोसपैंकी ५६ टक्के लसीचा वापरच करण्यात आलेला नाही, असं जावडेकर यांनी म्हटलं आहे.
या संदर्भात प्रकाश जावडेकर यांनी एक ट्विट केलं आहे. ‘केंद्राकडून महाराष्ट्राला आतापर्यंत ५४ लाख लसीचे डोस पुरवण्यात आले आहेत. परंतु, महाराष्ट्रानं केवळ २३ लाख लसीच्या डोसांचाच वापर केला आहे. याचाच अर्थ ५६ टक्के लसीचा वापरच झालेला नाही’ असा आरोप जावडेकर यांनी केला आहे. यानंतरही, शिवसेनेचे खासदार संसदेत राज्यासाठी अतिरिक्त लशीचा पुरवठा करण्याची मागणी करत आहेत.
कोरोना महामारीच्या काळात ‘गैरव्यवस्था’ आणि आता लसीकरणादरम्यान ‘चुकीच्या प्रशासकीय हाताळणी’ दिसून येत आहे. महत्वाची बाब म्हणजे, आज (१७ मार्च) पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोनाच्या वाढत्या संक्रमणासंबंधी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा सुरु आहे. मात्र, त्या आधीच अगोदर प्रकाश जावडेकर यांनी हे ट्विट केलं आहे.
Maharashtra Government had only used 23 lakh vaccines out of the total 54 lakh vaccines sent to the state, till 12th March. 56% vaccines remained unused. Now, Shiv Sena MP asks for more vaccines for the state.
First mismanagement of pandemic now poor administration of vaccines.— Prakash Javadekar (@PrakashJavdekar) March 17, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.