HW News Marathi
महाराष्ट्र

‘विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सुरु करा’, आमदार प्रशांत परिचारकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पंढरपूर। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धार्मिकस्थळे बंद ठेवण्याचा सरकारने निर्णय घेतला होता. ११ जिल्ह्यात निर्बंध शिथिल करणार आले आहेत, परंतु धार्मिक स्थळे अद्यापही बंद आहेत. आजच्या(४ ऑगस्ट) कामिका एकादशीला पंढरपूरात गर्दी होण्याची शक्यता आहे. अशावेळी कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता पंढरपुरात प्रवेश करणाऱ्यांची कोरोना चाचणी करा, अशी मागणी आमदार प्रशांत परिचारक यांनी केलीय. राज्य सरकारनं नुकतेच काही नियम शिथिल केले आहेत. पण मंदिरं सुरू करण्याबाबत सरकार उदासीन आहे. गर्दीची अन्य ठिकाणं सुरू आहेत, मात्र मंदिरांवरच बंधन का? असा सवालही परिचारक यांनी केला आहे.

मंदिर सुरू करण्याची मागणी

पंढरपुरात कोरोनाचं संक्रमण वाढू नये म्हणून सरकारने आषाढी वारी रद्द केली होती. सद्या पंढरपूरमध्ये सरासरी १०० पेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण सापडू लागले आहेत. यातच सध्या शहरात कोरोना रुग्णांची संख्या जवळपास ८०० गेली आहे. रविवारी केलेल्या तपासणीत १२८ नव्याने रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून संचारबंदीबाबत विचार केला जात आहे. मात्र गेल्या दोन वर्षापासून विठ्ठल-रुख्मिणी मंदिर लॉक-अनलॉक पद्धतीने चालू आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे मंदिर बंद ठेवण्यापेक्षा पंढरपूरमध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविकाची कोरोना टेस्ट करुनच त्यांना प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी परिचारक यांनी केलीय. कोरोना चाचणी केल्यामुळे संसर्ग रोखण्यास मदत होईल आणि व्यापाऱ्यांचीही उपजीविका भागेल, असं परिचारक यांनी म्हटलंय. त्यामुळे कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले भाविक आणि कोरोना चाचणी केलेल्या भाविकांना पंढरपुरात प्रवेश द्यावा, अशी मागणी परिचारक यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

पंढरपूर शहर आणि तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ

आषाढी वारी झाल्यानंतर आता पंढरपूर शहर आणि तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे पंढरपूर प्रशासनानं खबरदारी घेतल्याचं पाहायला मिळत आहे. शहरात आणि तालुक्यातील गावोगावी रॅपिड आणि RTPCR चाचणीचे कॅम्प भरवले जाणार असल्याची माहिती पंढरपूर प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यासाठी प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी पुढाकार घेतला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदीसाहेब शेतकऱ्यांसोबत युध्द लढणार आहे का? – नवाब मलिक

News Desk

“…तर आम्हाला आत्महत्या करायला परवानगी द्या”‘ मुख्यमंत्र्यांकडे धक्कादायक मागणी!

Ruchita Chowdhary

मी सहजासहजी संपणारा राजकारणी नाही – एकनाथ खडसे

News Desk