HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक मुंबईत दाखल

मुंबई | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरी आणि कार्यालयावर आज (२४ नोव्हेंबर) ईडीने छापा टाकला. दरम्यान, या सर्व घडामोडीत प्रताप सरनाईक देशाबाहेर होते. मात्र, आता मुंबईत ते दाखल झाले आहेत. ईडीच्या धाडीनंतर तब्बल ११ तासांनी सरनाईक मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांनी आधी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामानाच्या कार्यालयात जात शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली आहे.

आज सकाळी ईडीने प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरी आणि कार्यालयावर धाड टाकली. तसेच, त्यांची २ मुले विहंग आणि पुर्वेश सरनाईक यांच्या घरावरही धाड टाकली आणि त्यांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईचे भाजपकडून समर्थन केले जात आहे. तर आघाडी सरकार आक्रमक झाले आहेत. आता प्रताप सरनाईकांची चौकशी कशा पद्धतीने होणार? हे प्रकरण कुठे जाणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कंगना फक्त कारण आहे, बेबी पेंग्विनला वाचवायचे आहे !

News Desk

पहाटेच्या शपथविधीला दोन वर्ष पूर्ण!; फडणवीसांनी केला नवा विक्रम

News Desk

भाजपचं ‘मिशन बारामती’ यशस्वी होणार? का भडकल्या निर्मला सीतारामन

Manasi Devkar