HW News Marathi
महाराष्ट्र

पहाटेच्या शपथविधीला दोन वर्ष पूर्ण!; फडणवीसांनी केला नवा विक्रम

मुंबई | राज्याचे सध्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटे शपथ घेतली होती. यावरून राज्यसह देशभरात एकच खळबळ उडाली होती. सर्वांची झोप उडवणाऱ्या फडणवीस आणि पवार यांच्या शपथ विधी सोहळ्याला आज (२३ नोव्हेंबर) दोन वर्षपूर्ण झालं आहे.

येत्या २०१९ साली राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या. विधानसभेच्या निकालनंतर राज्यात सत्ता स्थापनेचा संघर्ष निर्माण झाला होता. दरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोघांनी पाठिंब्यावर सत्ता स्थापनेचा दावा २३ नोव्हेंबर २०१९ साली भल्या पहाटे राजभवानात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थित मुख्यमंत्री पदाची शपथविधी सोहळा पार पडला होता.

अवघ्या तीन दिवसात कोसळलं सरकार

फडणवीसांनी मुख्यमंत्री आणि पवारांनी उपमुख्यमत्री पदाची शपथ घेतली. यावेळी दोन परस्परविरोधी विचारधारेचे पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार हेच सर्वात मोठे आश्चर्या होतं. हे दोन्ही पक्ष एकत्र केस आलं?, हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडला होता. यानंतर अवघ्या दोन दिवसात अजित पवारांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी दिलेला पाठिंबा काढून घेतला. यानंतर फडणवीस सरकार अल्पमतात आल्यानंतर त्यांनी देखील मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे विरोधी विचारधारेचे सरकार अवघ्या तीन दिवसात कोसळलं.

फडणवीसांचा दुसरा विक्रम

अजित पवारांनी राष्ट्रवादी विरोधात बंडखोरी करत भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी पाठिंबा दिला होता. यात पवारांच्या गटातील १२ मंत्रीपदे आणि १५ महामंडळं दिली जातील, असं गणित त्यावेळी ठरलं होतं. यावेळी फडणवीसांनी सर्वात कमी कालावधीसाठी राज्याचे मुख्यमंत्री पदी विराजमा राहिल्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदवण्यात आला आहे.

राष्ट्रवादी-शिवसेना-काँग्रेस सत्ता स्थापनंचं मोर्चे बांधणी सुरू

दुसऱ्या बाजुला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, काँग्रेसचे नेते महाविकास आघाडीची मोर्चे बांधण्यास सुरू असतानाच अचानक अजित पवारांच्या मदतीने फडणवीस दुसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री घेतल्यानं सर्वांना मोठा धक्का सला होता. .

पवारांसोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय विचारपूर्वक

पवारांसोबत एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याचा निर्णय हा विचारपूर्वक घेतला होता, असे फडणवीस म्हणालं. “सर्व पक्षांनी आम्हाला वाळीत टाकायचं ठरवलं आहे. मग बहुमताच उपयोग होणार नाही. हे जेव्हा आमच्या लक्षात आले. तेव्हा आम्ही खेळात टिकून राहण्यासाठी अजित पवारांसोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय आम्ही घेतला,” फडणवीसांनी एका कार्यक्रमात म्हटलं. तर दुसरीकडे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं एक दिवस आधीच तिन्ही पक्ष एकत्र येवून सरकार स्थापन करण्यास सहमती दर्शवली होती, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून स्पष्ट करण्यात आले होतं.

शिवसेना-भाजप युतीला स्पष्ट बहुमत

२०१९ विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप यांच्या युतीला स्पष्ट बहुमत मिळालं होतं. निवडणुकीपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मातोश्रीमध्ये झालेल्या बैठीत बहुमत आल्यावर शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असल्याचं आश्वासन दिले होतं. परंतु युतीला बहुमत मिळाल्यानंतर शिवसेनेनं मुख्यमंत्री पदाची मागणी केली होती. त्यावर भाजपनं शिवसेनेला मुख्यमंत्री पद देण्यास स्पष्ट नकार दिला होता. यानंतर शिवसेनेने भाजपशी युती तोडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र येवून सत्ता स्थापन केली. आणि महिन्याभर रंगलेल्या सत्तास्थापनंच्या नाट्यमय घडामोडीनंतर महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे तर उपमुख्यमंत्री पदी अजित पवार हे दोघे विराजमान झाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून सर्व महिलांना ट्रेनने प्रवास करण्याची परवानगी

News Desk

आपली खरीप पिकं आता सुरक्षित राहणार !

News Desk

“बात निकली है तो दुर तक जायेगी”, रोहिणी खडसेंच्या ‘त्या’ वक्तव्याचा राम सातपुतेंनी घेतला समाचार

News Desk