महाड | माणगाव, महाड परिसाला अतिवृष्टीचा तडाखा बसल्यानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते तातडीने रात्री उशिरा माणगावमध्ये दाखल झाले. त्यांच्या सोबत माजी मंत्री व आमदार गिरीश महाजन, आमदार निरंजन डावखरे आहेत. भर पावसात अतिशय खडतर प्रवास करीत विरोधी पक्ष नेते दरेकर माणगाव जवळील तासगाव टोल नाक्यापर्यत कसेबसे पोहोलचले आहेत. परंतु पुढे रस्त्यावर जवळ जवळ सहा फुट पाणी असल्यामुळे पुढील मार्ग बंद करण्यात आले आहेत. त्यांच्यासोबत रेस्क्यु टीमही उपस्थित आहे. त्यांच्यासोबत दरेकर यांनी चर्चा करुन येथील पूरपरिस्थीतीची व बचाव कार्याची माहीती घेतली.
प्रविण दरेकर यांनी सांगितले की, बचाव दल आमच्यासोबत असून त्यांनी आम्हाला पुढे जाण्यास अटकाव केला आहे. पाणी ओसरल्यानंतर एनडीआरएफची टीम बोटीने पुढील प्रवास करतील. आम्ही सुध्दा एनडीआरएफ टीम सोबत जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. येथे भीषण परिस्थिती निर्माण झाली असून संपूर्ण महाड व रायगडचा परिसर जलमय झाला आहे. यामुळे येथील नागरिकांना प्रचंड हालपेष्टांना सामोरे जावे लागत आहे.
अतिवृष्टीमुळे माणगाव, महाड येथील नागरिक घाबरले असून अनेक नागरिक आपला जीव वाचविण्यासाठी एसटीच्या टपावर बसले आहेत. महाडमधील तळा येथील गावातही दरड कोसळल्याची घटना घडली आहे. तर दुस-या बाजूला जलमय झालेल्या परिस्थितीत येतील नागरिक अडकले आहेत. पण या संकटाच्या स्थितीत आम्ही त्यांच्या सोबत असल्याचे दरेकर यांनी सांगितले.
आज (२३ जुलै) पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. माणगावमध्ये अडकलेल्या दरेकर, महाजन यांचा पुढे महाडपर्यंत जाण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरेकर म्हणाले की, “महाडला जायचा आमचा प्रयत्न सुरू आहे.पण टोळ फाट्याला प्रचंड पाणी असल्याकारणाने आम्ही थांबलेलो आहोत. एन डी आर एफ च्या मदतीने बोटीने पुढे जायचं आमचा प्रयत्न सुरू आहे. बोटीने महाडकडे जाण्याचा प्रयत्न करत आहोत. महाड शहर पूर्ण पणे पाण्याखाली आहे. लोक आपल्या स्व रक्षणाकरिता गच्चीवर आणि एसटीच्या टपावर बसली आहेत”.
“महाडमध्ये सर्व गाव पुराने वेढलेली आहेत. महाड वसियांच्या रक्षणा करीता हेलिकॉप्टर येत असल्याने त्यांना सुरक्षीत स्थळी पोहोचवल्या करिता मदत होईल. आम्ही मुंबईला संपर्क करून जीवनावश्यक वस्तू प्रयत्न करू पण अडचण अशी आहे की त्यांच्यापर्यंत त्या वस्तू कशा पोहोचतील कारण पुरामुळे समन्वयाच्या अडचणी आहेत. आम्ही महाड वासियंच्या मदतीकरिता पुढे कसे जाता येईल अशी धडपड करत आहोत. पुरामुळे यंत्रणा आणि मदत कशी करता येईल हा चिंतेचा विषय आहे”, असं दरेकर यांनी सांगितले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.