HW News Marathi
महाराष्ट्र

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची पंकजा मुंडेंची मागणी रास्त – प्रविण दरेकर

मुंबई | पूजा चव्हाण प्रकरणावरुन संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांनीदेखील राजीनामा देण्याची मागणी केली आहे. पंकजा मुंडेंच्या या मागणीला विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पाठिंबा दिला असून अधिवेशनात यावरुन भाजपा आक्रमक भूमिका घेणार असल्याचं एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे. धनंजय मुंडे यांना वेगळा न्याय देण्यात आल्याने शिवसेनेत अंतर्गत वादळ असल्याचा दावाही यावेळी त्यांनी केला.“अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आम्ही राज्यपालांचं अभिभाषण यासहित इतर विषयांवरही चिरफाड करणार , मात्र वीजपुरवठा खंडित करणं हा मुख्य मुद्दा असणार आहे.

मोफत वीजेचं बोलता, पण देत नाहीच…कोरोना काळात अवाजवी बिलं आली त्यांचंही काही केलं नाही. उलट वीज खंडित करत तुम्ही त्या शेतकरी, ग्राहकाच्या जखमवेर मीठ चोळण्याचं काम केलं. नोटीस नाही, बिल तपासलं नाही…मोगलाई लागलीये का?,” अशी संतप्त विचारणा प्रवीण दरेकर यांनी केली.“बिल्डरला प्रीमियम देऊन सात, आठ हजार कोटी रुपये महसूल कमी करणार आणि वीजेच्या ग्राहकासाठी चार पाच हजार कोटी लागले तर ते उपलब्ध नाहीत. या विषयावर विधान परिषदेत हंगामा करणार,” असा इशारा प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.“संजय राठोड यांनी राजीनामा दिला नाही, तर महाराष्ट्रातील जनतेचा संताप होता.

भाजप ज्या पद्धतीने आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. आमच्या प्रदेशाध्यक्षांनी अधिवेशन होऊ न देण्याचा इशारा दिला त्यांनंतर यांना प्रतिमेची चिंता वाटू लागली आणि त्यातून तो राजीनामा घेतला. पंकजा मुंडेंची मागणी अत्यंत रास्त आहे. पहिलं आम्हाला वाटलं यांना सर्वांनाच वाचवायचं आहे. पण आता जर यांची नैतिकता जागी झाली असेल तर जो न्याय संजय राठोड यांना आहे, त्याच नैतिकतेवर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी पंकजा मुंडेंची मागणी असेल तर ती बरोबर आहे. त्यांनी राजीनामा द्यावा, महाराष्ट्रातील जनता स्वागत करेल,” असं प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राहुल गांधींविरोधात दापोलीतून तालुक्यातून याचिका दाखल!

News Desk

तुळजाभवानी मंदिर परिसरात भीक मागणाऱ्या बालकांची सुटका

Manasi Devkar

ED ची ठाण्यात मोठी कारवाई, मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यांची संपत्ती जप्त

Aprna