HW News Marathi
महाराष्ट्र

खडसेंनी नैतिकतेच्या गोष्टी करु नयेत – प्रवीण दरेकर

मुंबई | भाजपला रामराम करत एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी मुंबईकडे येण्यास रवाना झाले आहेत. दरम्यान खडसेंनी भाजपचे आमदार संपर्कात असल्याचे वक्तव्य केले होते. त्याला विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

“एकही भाजपचा आमदार नेते एकनाथ खडसे यांच्या संपर्कात नाही. कालपर्यंत ते पक्षात होते, म्हणून आमदार संपर्कात होते. भाजप पक्षाचे भविष्य सर्वांना माहित आहे. जिर्घकाळ नेतृत्व करणारा इतका मोठा पक्ष असताना केंद्रात मोदी आणि राज्यात फडणवीस काम कसे करत आहेत हे सगळ्यांना माहित आहे”.

“तसेच, पहाटेच्या शपथविधी बाबत नैतिकता आणि राष्ट्रवादीत गेल्यानंतर अनैतिकता त्यामुळे खडसेंनी नैतिकतेच्या गोष्टी करु नयेत. फडणवीसांवर जे डाग लावले त्याबद्दल आम्ही भोगले आहे. तर शरद पवार खडसेंना तोडपाणी करणारा नेता असे म्हणाले होते आणि आता त्याच पक्षात गेले आहात ना. आणि नांदा सौख्य भरे, असे म्हणत दरेकरांनी एकनाथ खडसेंना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देत टोलाही लगावला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकऱ्यांचे आर्थिक बळकटीकरण करण्याचा शासनाचा प्रयत्न! – अजित पवार

Aprna

सहकारी बॅंक घोटाळ्यामध्ये अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या अडचणीत वाढ होणार का?

News Desk

वैद्यकीय क्षेत्रातील मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा  

News Desk