HW News Marathi
महाराष्ट्र

रिकामटेकडे दौरा करतात की टीका हे महाराष्ट्र पाहतोय, दरेकरांचा राऊतांना टोला

मुंबई | विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. केवळ मीडियात येऊन अश्रू पुसणं आणि प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन त्यांची अश्रू पुसणं वेगळं आहे. तौक्ते वादळातही आम्ही साईटवर होतो. आताही होतो. त्यामुळे रिकामटेकडे दौरा करतात की फक्त टीका करतात हे महाराष्ट्राची जनता पाहात आहे, असा जोरदार हल्ला प्रविण दरेकर यांनी चढवला आहे.

प्रविण दरेकर यांनी आज (३१ जुलै) माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊतांना चोख उत्तर दिलं आहे. संजय राऊत यांनी बोलताना उक्ती आणि कृती याचं तारतम्य बाळगावं. एवढ्या पूरग्रस्त परिस्थितीत राऊत कधी पाण्यात उतरले का?, कुठे पाहणी करायला गेले का?, केवळ मीडियात येऊन वेगवेगळी वक्तव्य करणं अश्रू पुसणं हे वेगळं आहे. तोक्ते निसर्ग वादळात आम्ही साईटवर गेलो होतो. आता रिकामटेकडे दौरा करतात की टीका करतात हे महाराष्ट्राची जनता पाहते आहे, अशी टीका दरेकर यांनी केली. देवेंद्र फडणवीस ग्रासरूटचे नेते आहेत. सर्वसामान्य जनतेचा कानोसा राऊतांनी घ्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

राऊतांच्या बोलण्याला अर्थ नाही

पुन्हा येईन… पुन्हा येईन… हा विषय आता जूना झाला आहे. ते शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. देवेंद्र फडणवीस लोकनेते आहेत. राणे हे शिवसैनिक होते, ते त्यांनी कधी नकारलं नाही. राऊतांनी राणेंचं उदाहरण देत कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा देण्याचं काम केलंय. त्यांच्या बोलण्याला अर्थ नाहीये, असा टोलाही त्यांनी लगावला.

पंतप्रधानांकडे आणखी निधीची मागणी करणार

राज्याचे मुख्यमंत्री पंतप्रधानांवर काही बोलत नाहीत. त्यामुळे राऊतांच्या बोलण्याला महत्व नाही. पंतप्रधानांनी राज्याला 700 कोटी रुपये दिले आहेत. राज्याला आणखी निधी मिळावा म्हणून भाजप पंतप्रधांनाकडे मागणी करेल, असं त्यांनी सांगितलं. पूरग्रस्त भागात भीषण परिस्थिती आहे. व्यापारी आणि शेतकऱ्यांचं जीवनच उद्ध्वस्त झालं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस सरकारने जीआर काढून जशी मदत केली होती. तशीच मदत लोकांना जाहीर करणं अपेक्षित आहे, असंही ते म्हणाले.

संजय राऊत काय म्हणाले होते?

शिवसेना खासदार संजय राऊत आज (३१ जुलै) नगरमध्ये गेले होते. यावेळी त्यांनी पुन्हा येईनचा नारा लावला होता. राऊतांनी बोलताना असं म्हटलं की, जोपर्यंत चंद्र, सुर्य आहे, तो पर्यंत शिवसेना राहिल. बाळासाहेब ठाकरेंचं नाव राहील. पुढे संजय राऊत असं म्हणाले की, एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मला बोलावलं. मला परत बोलावलं तर मी परत येईन, पुन्हा पुन्हा येईन. जिथे भगवा झेंडा आहे तिथे मी येत राहील. कारण इथे आधी भगवा झेंडा होताच आणि त्याला आता शंकररावांनी दांडा बांधला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नाव घेता संजय राऊतांनी फडणवीसांना डिवचलं आहे. यावर फडणवीसांकडून काही प्रतिक्रिया येणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.

यावेळी त्यांनी केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांना डिवचले होते. संसदेत अनेक खासदार येतात. बऱ्याच खासदारांना कोणी ओळखतही नाहीत. पण शिवसेनेच्या खासदारांना ओळखले जाते. शिवसैनिक म्हणून ही ओळख आहे. पक्ष सोडून गेला तरी त्याची ओळख शिवसैनिक हीच राहते. हा नारायण राणे… तो आमका असं म्हणत नाही. तो शिवसैनिक आहे, असंच म्हटलं जातं. तुम्ही कुठंही जा लोकं तुम्हाला शिवसैनिक म्हणूनच ओळखणार, असा टोला राऊत यांनी राणेंना लगावला. आमदार आणि खासदार माजी होतो. पण शिवसैनिक कधीच माजी होत नाही, असंही ते म्हणाले. सत्ता हा मानसिक आधार आहे. सत्ता असो वा नसो शिवसेना स्टाईलने अधिकाऱ्यांकडून कामे करून घ्या, असं राऊत म्हणाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

HW Exclusive : कोरोनाशी झुंज देणाऱ्या त्या कोरोनामुक्त लढवय्यांचा प्रवास

swarit

ED अधिकाऱ्यांवरील गंभीर आरोपांवर मुंबई पोलिसांची एसआयटी! – गृहमंत्री

Aprna

“पडळकरांनी गांजा घेऊन बिरोबाची खोटी शपथ घेतली होती का?”, शेळकेंचा पलटवार

News Desk