HW News Marathi
देश / विदेश

महाराष्ट्रातील पोलीसांना शौर्य पदक जाहीर

नवी दिल्ली | महाराष्ट्रातील पोलीसांना त्यांच्या उल्लेखीनय कामगिरीसाठी दिले जाणारे शौर्य पदक, विशिष्ठ सेवा पदक व गुणवत्ता सेवा पदक जाहिर करण्यात आले आहे. जाहीर केलेल्या या यादीत देशातील १०४० पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

देशातील ४ पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलिस शौर्य पदक, २८६ पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलिस शौर्य पदक तर ९३ पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विशिष्ठ सेवा पदक आणि ६५७ पोलिसांना गुणवत्ता सेवा पदक प्रदान करत त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील १० पोलिस अधिकाऱ्यांना पोलीस शौर्य पदक ,४ पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक तर ४० पोलिसांना गुणवत्ता सेवा पदक जाहीर झाले आहेत.

पदक जाहीर झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांची नावे

शौर्य पदक : मिठू नामदेव जगदाळे, सुरपत बावाजी वड्डे, आशिष मारूती हलामी, विनोद राऊत, नंदकुमार अग्रे, डॉ.एमसीव्ही महेश्वर रेड्डी, समीरसिंह साळवे, अविनाश कांबळे, वसंत अत्राम आणि हमीत डोंगरे.

विशिष्ठ सेवा पदक : अर्चना त्यागी (आयपीएस), संजय सक्सेना (आयपीएस), शशांक सांडभोर (सहा.पोलीस आयुक्त), वसंत साबळे (सहा.पोलीस निरिक्षक)

गुणवत्ता सेवा पदक : धनंजय कुलकर्णी (पोलीस अधिक्षक), नंदकुमार ठाकुर (पोलीस उपायुक्त, मुंबई), अतुल पाटील (अतिरिक्त आुयक्त मुंबई), नंदकिशोर मोरे (सहाय्यक आयुक्त, मुंबई), स्टीव्हन मॅथ्यू ॲनथनी (सहा.आयुक्त मुंबई), निशिकांत भुजबळ (सहा.आयुक्त, औरंगाबाद), चंद्रशेखर सावंत (उपाधिक्षक, अकोला), मिलिंद तोतरे (निरिक्षक, नागपूर), सदानंद मानकर (निरिक्षक, अकोला), मुकुंद पवार (वरिष्ठ निरिक्षक, मुंबई) संभाजी सावंत (निरिक्षक, सांगली), कायोमर्ज बोमन इरानी (सहा.आयुक्त, मुंबई), गजानन काबदुले (वरिष्‍ठ निरिक्षक, मुंबई शहर), निलिमा अरज (निरिक्षक, अमरावती), इंद्रजीत कारले (सहा.आयुक्त ठाणे), गौतम पराते (निरिक्षक औरंगाबाद), सुभाष भुजंग (निरिक्षक जालना), सुधीर दळवी (निरिक्षक, मालाड, मुंबई), किसन गायकवाड (निरिक्षक, तुर्भे,नवी मुंबई), जमिल सय्यद (उपनिरिक्षक, नांदेड), मधुकर चौगुले (उपनिरिक्षक, गगनबावडा, कोल्हापूर),

भिकन सोनार (उपनिरिक्षक, जळगांव), राजू अवताडे (सहा.पोलीस उपनिरिक्षक, अकोला), शशिकांत लोखंडे (सहा.पोलीस निरिक्षक, मुंबई), अशफाखअली चिस्तीया (मुख्य हवालदार, गडचिरोली), वसंत तराटे (सहा.पोलीस उपनिरिक्षक, मुंबई शहर), रविंद्र नुल्ले (सहा.पोलीस उपनिरिक्षक, कोल्हापूर), मेहबूबअली सय्यद (सहा.पोलीस उपनिरिक्षक, नाशिक शहर), साहेबराव राठोड (सहा.पोलीस उपनिरिक्षक), दशरथ चिंचकर (सहा.पोलीस उपनिरिक्षक, मावळ, पुणे), लक्ष्मण टेंभुर्णे (सहा.पोलीस उपनिरिक्षक, गडचिरोली), बट्टुलाल पांडे (सहा.उपनिरिक्षक, नागपूर शहर), विष्णू गोसावी (सहा.उपनिरिक्षक, नाशिक), प्रदीप जांभळे (सहा.उपनिरिक्षक, पुणे), चंद्रकांत पाटील (सहा.उपनिरिक्षक, जळगांव), भानूदास जाधव (मुख्य हवालदार, मुंबई शहर), नितिन मालप (इटिलीजन्स अधिकारी, मुंबई), रमेश शिंगाटे (मुख हवालदार, मुंबई), बाबुराव बिऱ्हाडे (इटिलीजन्स अधिकारी, नाशिक), संजय वायचळे (मुख्य हवालदार, नाशिक).

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मी देश सोडून पळणार नाही’; युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचं रशियाला आव्हान

Manasi Devkar

टाईम मॅक्झिनच्या १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान मोदींचा समावेश

News Desk

वाजपेयींच्या अंत्यदर्शनासाठी जगभरातील दिग्गजांची उपस्थिती

News Desk