HW News Marathi
देश / विदेश

‘मी देश सोडून पळणार नाही’; युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचं रशियाला आव्हान

मुंबई | सध्या जगभरात रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या वादाची जोरदार चर्चा सुरू आहे. इतकंच नाही तर त्यांच्यातील युद्धाचे जगात सर्वत्र पडसाद उमटताना दिसत आहेत. रशिया-युक्रेनच्या युद्धाचा आजचा तिसरा दिवस असून आतापर्यंत अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की हे देश सोडून जाणार अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, याबाबत आता त्यांनी स्वतः एक व्हिडिओ शेअर करून स्पष्टीकरण दिलं आहे.

राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी काल (२६ फेब्रुवारी) रात्री उशिरा एक व्हिडिओ शेअर करत युक्रेनवासीयांना आणि सैन्याला अत्यंत महत्त्वाचा संदेश दिला आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत रशियापुढे झुकणार नाही, असेही त्यांनी सांगितले आहे. अमेरिकेकडून झेलेन्स्की यांना देश सोडण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. झेलेन्स्की यांना देश सोडायचा असल्यास त्यांना मदत करु, असा प्रस्ताव अमेरिकेने त्यांना दिला होता. मात्र, झेलेन्स्की यांनी हा प्रस्ताव नाकरला असून मी पळून जाणाऱ्यांपैकी नाही, असे त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हंटले आहे. ते म्हणाले, “मी हा देश सोडणार नाही. त्यापेक्षा आम्हाला शस्त्रास्त्र द्या, कोणत्याही परिस्थितीत मी देश सोडून पळून जाणार नाही”, असं झेलेंस्की यांनी म्हटलं आहे. यामुळे झेलेन्स्की यांनी देश सोडून पळ काढल्याच्या चर्चा आता थांबल्या आहेत.

आम्ही शस्त्रे खाली ठेवणार नाही

झेलेन्स्की यांनी अमेरिकेची मदत नाकारत रशियाच्या विरोधात ठामपणे उभे राहणार असल्याचे सांगितले आहे. आपल्या देशवासियांसोबत तिथेच राहून हा लढा लढणार अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. दरम्यान, आज पुन्हा झेलेन्स्की यांनी आणखी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. आपल्या ट्वीटर अकाऊंटवर त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी अफवांवर विश्वास ठेऊ नका असे आवाहन केले आहे. एएफपीच्या वृत्तानुसार या व्हिडिओमध्ये झेलेन्स्की यांनी खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका असा संदेश दिला आहे. आम्ही शस्त्रे खाली ठेवणार नाही. ही आपली मायभूमी आहे. आम्ही सर्वांचे संरक्षण करू, असा संदेश झेलेन्स्की यांनी आपल्या देशवासियांना दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप सुकलेल्या तलावात कमळे फुलवीत, सामनातून भाजपवर टीका

News Desk

काश्मीर मुद्यावरून मलालाने केलेल्या ट्वीटवर नेटकऱ्यांची सडकून टीका

News Desk

भंडाऱ्यातील बालकांच्या मृत्यूने पंतप्रधान देखील हळहळले!

News Desk