HW News Marathi
महाराष्ट्र

दिल्लीत नरेंद्र आणि मुंबईत देवेंद्र हा फॉर्म्युला पाच वर्षांपासून सुपरहिट !

नवी मुंबई। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधानसभा निवडणुकीसाठी काल (१६ ऑक्टोबर) राज्यातील प्रचार सभा घेतल्या होत्या. यासभे दरम्यान मोदी म्हणाले की, “दिल्लीमध्ये तुम्ही नरेंद्रला बसवले त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देवेंद्रला पुन्हा संधी द्या. दिल्लीत नरेंद्र आणि मुंबईत देवेंद्र हा फॉर्म्युला पाच वर्षांपासून सुपरहिट राहिला आहे, ऐणाऱ्या पाच वर्षात देशाला आणि राज्याताला विकास नव्या उच्चवर घेऊ जाणार असल्याचे मोदींनी यावेळी सांगतले.” खारघरच्या सभेदरम्यान मोदी म्हणाले की, नवी मुंबई विमानतळ लवकरच सुरू, असे होणार आहे. कोकणचा हा परिसर भारतातील नव्या अर्थव्यवस्थेचा गड ठरणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

विधानसभा निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ अकोला, परतूर व नवी मुंबईतील खारघर येथे झालेल्या सभांमध्ये मोदी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडले.मोदी सभेदरम्यान म्हणाले की, कोकणातील समुद्र पर्यटनामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार आहे, असे स्पष्ट करून मच्छीमार खऱ्या अर्थाने देशाचे राखणदार आहेत. समुद्रजीवांना प्लास्टिकचा धोका होणार नाही, याबाबत काळजी घेणे गरजेचे, असे सांगत पंतप्रधानांनी प्लास्टिक संदर्भातील जनतेच्या संदेश दिला. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांचे अंडरवर्ल्डमधील भूमाफियांशी संबंध होते, त्यामुळे येथील रिअल इस्टेटमध्ये भ्रष्टाचाराचा पैसा ओतण्यात आला. मात्र, ‘रेरा’सारख्या कायद्याने भूमाफियांना आवर बसला, असे आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर सडकून टीका केली.

काँग्रेसच्या काळात मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील सूत्रधार देशाबाहेर कसे पळून गेले, त्यांचे कोणत्या नेत्यांशी संबंध होते, असे प्रश्न उपस्थित करतानाच, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या भ्रष्ट आघाडीने सिंचन घोटाळा करून महाराष्ट्राला विकासात मागे ठेवल्याचा आरोप त्यांनी अकोला येथील सभेत केला. ते म्हणाले, एके काळी महाराष्ट्रात नित्य बॉम्बस्फोट होत असत. मुंबईमध्ये भितीचे वातावरण होती. त्या काळी झालेल्या अनेक बॉम्बस्फोटांचे मास्टरमाइंड देशाबाहेर पळून गेले. ते आता शत्रू देशांमध्ये तळ ठोकून आहेत, असे मोठे गुन्हेगार कसे पळून गेले, याचे उत्तर काँग्रेसने देशाला दिले पाहिजे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

रश्मी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट, एक जण ताब्यात

News Desk

पवार परिवाराशी संबंधित पारनेर कारखाना घोटाळाप्रकरणी लवकरच कारवाई सुरू होणार – सोमय्या

News Desk

‘जेलमध्ये टाकलं तरी बैलगाडा शर्यत होणार’, गोपीचंद पडळकरांची आक्रमक भूमिका!

News Desk