HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादी-भाजपने महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याची पंतप्रधानांनी दिली ऑफर; शरद पवारांनी केला खुलासा

मुंबई | राष्ट्रवादी आणि भाजपने एकत्र येऊन महाराष्ट्रात सरकार स्थापन करावे, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा होती, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ‘लोकसत्ता’ या वृत्त पत्राच्या ‘अष्टावधानी’ पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमा वेळी म्हणाले. शरद पवार यांच्या ८१ व्या वाढ दिवसानिमित्ताने ‘लोकसत्ता’ या वृत्त पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा पुस्तक प्रकाशन सोहळा काल (२९ डिसेंबर) पुण्यात पार पडला होता.

यावेळी शरद पवार म्हणाले, “भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन राज्यात सरकार स्थापन करावे, अशी इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची होती. पंरतु, याबाबत मोदींनी तसा प्रस्तावही दिला होता. मात्र आमच्या पक्षाची विचारधारा वेगळी असल्याने हे शक्य होणार नसल्याचे मी पंतप्रधानांना त्यांच्या कार्यालयात जाऊन सांगितले. पण, तरीही तुम्ही विचार करा, असे मोदी यांनी सांगितले. राज्यात आमचेही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस काही जमत नव्हते. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीला बरोबर घ्यावे, हा विचार भाजप नेतृत्वाच्या मनात आला असेल आणि त्यांनी चाचपून पाहिले असेल,” यासंदर्भात त्यांनी पहिल्यांदा एका कार्यक्रमात सांगितले. 

केशव उपाध्येंट्वीट करत टोला लगावला

शरद पवारांच्या वक्तव्यानंतर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्येंनी तीन ट्वीट करत त्यांचे मत व्यक्त केले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीला ऑफर दिल्याची माहिती शरद पवार यांनी दिली पण पवारासाहेब आणि विश्वासार्हता?, असे ट्वीटमध्ये त्यांची भूमिका मांडली. तर दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हटले, “पवार साहेबांनी दुसऱ्याच दिवशी बंड करून खंजीर खुपसतात(संदर्भ- प्रतापराव भोसले), त्यांनी वसंतदादा पाटील यांचा विश्वासघात केला, आपले गुरू यशवंतराव चव्हाण यांनी पडत्या काळात सोडले, सोनिया गांधींना विदेशी मुळावरून विरोध केला आणि त्यांच्याच सरकारमध्ये जाऊन,” तर पहिल्या ट्वीटमध्ये म्हटले, “बसले,आम्हाला विरोधात बसायचा जनादेश आहे असे सांगत 2019 ला शिवसेनेबरोबर सरकार स्थापन केले… ज्यांची कृती व उक्ती वेगळी राहिली कायम त्यांचा मोदीनी ॲाफर दिली यांवर कोण विश्वास ठेवणार?” 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी जमिनीचे पट्टे देणार! – विजय वड़ेट्टीवार

Aprna

“लावालावी करायचं काम, संजय राऊत त्याचं नाव”; नारायण राणेंनी डिवचलं

News Desk

MIMने आपण भाजपा विरोधी असल्याचे कृतीतून सिद्ध करावं! – अतुल लोंढे

Manasi Devkar