HW News Marathi
महाराष्ट्र

माजी मुख्यमंत्र्यांचा आजी मुख्यमंत्र्यांना लॉकडाऊनबद्दल दिला ‘हा’ सल्ला

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं होणारी वाढ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रशासनाला लॉकडाऊनच्या उपाययोजना करण्याचे दिलेले आदेश, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा लॉकडाऊनला असलेला विरोध पाहता सर्वत्र लॉकडाऊनचीच चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांनीही महत्त्वाची माहिती दिली. लॉकडाऊन कोणालाही आवडत नाही. पण तहान लागल्यावर विहीर खणायची नाही. त्यामुळेच लॉकडाऊनची पूर्वतयारी करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, आता काँग्रेसनंही लॉकडाऊनला थेट विरोध दर्शवला आहे.

काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराच चव्हाण यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक पत्रच शेअर केलं आहे. त्यामध्ये, लॉकडाऊन करणार असाल, तर अगोदर लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा करा, असा इशारावजा सल्लाच चव्हाण यांनी सरकारला दिला आहे. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे, प्रशासन आणि राज्य सरकार यांच्यापुढे पेचप्रसंग उभा आहे. सध्या, उद्योजकांपासून ते सर्वसामान्य नागरिक लॉकडाऊन विरोध करत आपल मत मांडत आहे. त्यामुळे, राज्य सरकारने काही बाबी लक्षात घ्याव्यात, असे चव्हाण यांनी आपल्या पत्रातून सूचवलं आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराच चव्हाण यांनी राज्य सरकारला अशा सूचना केल्या आहेत. तसेच, केंद्र सरकारने अचानक केलेल्या लॉकडाऊनचा फटका अर्थव्यवस्थेला बसला असून जवळपास देशातील 3 कोटी नागरिक दारिद्र्य रेषेखाली ढकलली गेल्याचंही त्यांनी निदर्शनास आणून दिलं.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खडसे राष्ट्रवादीमध्ये येणार का? अजित दादा म्हणतात…

News Desk

#CoronaVirus : मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या दृष्टीने घेतले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय

swarit

मुंबईहून मांडव्याच्या दिशेने जाणारी बोट समुद्रात उलटली, ८८ प्रवाशांना वाचवण्यात यश

swarit