HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवारांवर ८-१० दिवसांत आणखी एक शस्त्रक्रिया होणार!

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर काल शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांची प्रकृती उत्तम आहे, असं सांगतानाच येत्या ८ ते १० दिवसात त्यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज (३१ मार्च) दिली आहे.राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांच्या प्रकृतीची माहिती दिली.

शरद पवारांवर काल यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यांच्या पित्ताशय नलिकेत खडे आढळले. त्यामुळे त्यांना पोटदुखीचा त्रास होत होता. मात्र, एन्डोस्कोपीद्वारे हे खडे काढण्यात आले आहेत. आता त्यांची प्रकृती उत्तम असून त्यांना आराम वाटत आहे. त्यांचा पोटदुखीचा त्रासही थांबला आहे, असं टोपे यांनी सांगितलं.

दैनंदिन कार्यावर परिणाम नाही

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पवारांचा गॉल ब्लॅडर काढण्यात येणार आहे. गॉल ब्लॅडर काढल्याने त्यांच्या दैनंदिन कार्यप्रणालीवर काहीही परिणाम होणार नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. पोटदुखीचा त्रास वारंवार होऊ नये म्हणून डॉक्टरांनी हा निर्णय घेतला. येत्या 8-10 दिवसांत त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून गॉल ब्लॅडर काढण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा एडमिट करण्यात येणार आहे. मात्र, त्यांची प्रकृती आणखी उत्तम वाटली तर लगेच चार-पाच दिवसातही त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलंंआहे .

शरद पवारांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर आज सकाळी माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे यांनी पवारांची भेट घेतली. नारायण राणे यांनी पत्नी नीलम आणि पुत्र आमदार नितेश राणे यांच्यासह पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करत भेट घेतली होती. तर, दोन दिवसांपूर्वी पवारांना पित्ताशयाचा त्रास जाणवल्यानंतर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि बहुतांश बड्या राजकारण्यांनी पवारांच्या प्रकृतीची चौकशी केली होती

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

PandharpurElection : पंढरपुरात पहिल्या फेरीत भाजपला ४५० मतांची आघाडी तर राष्ट्रवादीची पिछाडी

News Desk

जळगाव-पुण्याला मिळाले नवे पालकमंत्री

News Desk

“आपल्या आईची हत्या करुन अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली”, अर्णब गोस्वामींच्या वकीलांचा युक्तीवाद

News Desk