HW News Marathi
Covid-19

राऊतांनी घेतलेल्या मुख्यमंत्र्यांच्या ‘अनलॉक’ मुलाखतीचा प्रोमो रिलीज, ‘हे’ आहेत महत्त्वाचे मुद्दे  

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गाजलेल्या मुलाखतीनंतर आता ‘सामना’चे कार्यकारी संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘अनलॉक मुलाखत’ घेतली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’करिता राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतरची उद्धव ठाकरेंची ही निश्चितच अनेकांची उत्सुकता वाढवणारी आहे. याच पार्श्वभूमीवर, संजय राऊत यांनी आज (२२ जुलै) या मुलाखतीचा पहिला प्रोमो रिलीज केला आहे. राज्यातील कोरोनाचे संकट आणि त्या ओघाने आलेली आव्हाने, लॉकडाऊन, विरोधी पक्षाकडून सातत्याने मुख्यमंत्र्यांवर होणारी टीका, अंतिम परीक्षांसंदर्भातील राज्य सरकारचा निर्णय आणि त्याबद्दल निर्माण झालेला संभ्रम अशा अनेक मुद्द्यांभोवती ही मुलाखत रंगलेली दिसते.

“राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतरचा हा ६ महिन्यांचा काळ कसा गेला ?” या संजय राऊतांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणतात, “हे सामने विविध आव्हाने घेऊन आले. त्यातले मोठे संकट म्हणजे कोरोना. हे संकट अजूनही संपता संपत नाही. सरणार कधी रण ? हे रण कधी संपणार हेच कळेनासे झाले आहे.” आपल्या ‘कोरोनासोबत जगायला शिका’ या आवाहनाबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणतात, “कोरोनासोबत जगायला सर्वांनीच शिकायला हवे. शेवटी शहाणे व्हायचं कि नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.” याचसोबतच संजय राऊत यांनी अनेक मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली.

राज्य सरकारच्या बहुचर्चित आणि मोठ्या संभ्रमात सापडलेल्या विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत देखील मुख्यमंत्र्यांनी या मुलाखतीत भाष्य केले आहे. पुढे “महाराष्ट्रात अशी वेळ खरंच आली होती का कि ज्यामुळे तुम्हाला सैन्याला पाचारण करावं असं वाटलं ? या ६ महिन्यांच्या काळात तुम्ही मंत्रालयात कमीत कमी वेळा गेलात या आरोपाबद्दल काय सांगाल ?” असे प्रश्न संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना विचारले. आता लॉकडाऊनला लोकं कंटाळली आहेत. हे कधी संपणार असे संजय राऊतांनी विचारले असता मुख्यमंत्री म्हणले कि, ” मी म्हणजे ट्रम्प नाही. मी माझ्या डोळ्यांसमोर माझी माणसे तळमळताना पाहू शकत नाही.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज ठाकरेंच्या ‘कृष्णकुंज’वरील २ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

News Desk

सोमवारपासून पुणे होणार अनलॅाक ! काय सुरू काय बंद?

News Desk

छत्तीसगडच्या राजनंदगावमध्ये मद्यासाठी सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी

News Desk