HW News Marathi
महाराष्ट्र

एसटी महामंडळातील चालक, वाहक, सहाय्यकासह शिपाईंना पदोन्नती

मुंबई | एसटी महामंडळातील चालक, वाहक, सहाय्यक, शिपाई व तत्सम पदावरील कर्मचाऱ्यांना आता लिपिक-टंकलेखक पदावर पदोन्नती मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी लिपिक-टंकलेखक संवर्गामध्ये २५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी आज(६ डिसेंबर) येथे केली आहे. एसटी महामंडळातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना या निर्णयाची अनोखी भेट देऊन मंत्री. रावते यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन केले.

चालक, वाहक, सहाय्यक, शिपाई, नाईक, हवालदार, उद्वाहन चालक, मजदूर, परिचर, खानसामा, अतिथ्यालय परिचर, सफाईगार, सुरक्षा रक्षक, खलाशी, सहाय्यक माळी, माळी व स्वच्छक या पदावरील कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. राज्यात या पदावर सुमारे १ लाख कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी विहीत शैक्षणिक अर्हता पूर्ण करणारे कर्मचारी लिपीक-टंकलेखक पदासाठी पात्र ठरतील. अशा कर्मचाऱ्यांसाठी आता महामंडळातील लिपिक– टंकलेखक संवर्गामधील २५ टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयामुळे महामंडळातील ज्या कर्मचाऱ्यांनी लिपिक-टंकलेखक पदासाठी आवश्यक शिक्षण घेतले आहे त्यांचे शिक्षण वाया न जाता आता त्यांना महामंडळातच पदोन्नतीची संधी मिळेल, असे मंत्री रावते यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात, पायलटच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

News Desk

पुणे महानगरपालिका आता राज्यातील सर्वात मोठी मनपा ! २३ गावांचा नव्याने समावेश

News Desk

देशातील जनतेला कोरोनाच्या खाईत लोटणाऱ्या मोदींनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा!

News Desk