HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा आरक्षण बांधलं काठीला, सरकार गेलं काशीला, सदाभाऊ खोतांचं दारात आंदोलन!

सांगली | रयत क्रांती संघटनेच्या वतीने मराठा आरक्षण मिळवण्यासाठी सदाभाऊ खोत यांनी राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात केली आहे. राज्य सरकारच्या अपयशामुळे आणि अशोक चव्हाण यांच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळू शकलं नसल्याची टीका करत खोत यांनी आंदोलन सुरू केलं आहे. सांगलीत इस्लामपूर इथं कुटुंबीयांसह घराच्या समोर निदर्शनं करत याची सुरुवात त्यांनी केली असून मुद्द्यावरून सरकारचा निषेध करत सरकारवर हल्लाबोलही केला आहे.

सदाभाऊ खोत यांनी रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून या राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात केली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या कष्टाने लढा देत मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलं. त्यासाठी न्यायालयीन लढा हा योग्य पद्धतीनं लढण्यात आला. पण सध्याच्या महाविकास आघाडी सरकारनं फडणवीसांनी मिळवून दिलेलं मराठा आरक्षण धुळीत मिळवलं, अशी टीका सदभाऊ खोत यांनी केली.

मराठ्यांचं आरक्षण बांधलं काठीला आणि महाविकास आघाडी सरकार गेलं काशिला

मराठ्यांचं आरक्षण बांधलं काठीला आणि महाविकास आघाडी सरकार गेलं काशिला अशा घोषवाक्याने या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयात ज्या पद्धतीनं आरक्षणासाठी बाजू मांडायला हवी होती, तशी मांडली गेली नाही, यामुळं हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकलं नाही असं खोत म्हणाले. मराठा समाज खेड्या पाड्यात राहणारा, शेतीत राबणारा अल्पभूधारक असा आहे. त्यामुळे मराठा समाजानं आरक्षणाची न्याय मागणी मांडली

फडणवीसांनी आरक्षण मिळवून दिले होतं पण प्रस्थापित मराठ्यांना हे आरक्षण नको होतं

देवेंद्र फडणवीस यांनी हे आरक्षण मिळवून दिलं होतं. पण प्रस्थापित मराठ्यांना हे आरक्षण नको होतं. कारण आरक्षण मिळालं असतं तर प्रस्थापित मराठे विस्थापित मराठ्यांच्या मांडीला मांडी लावून बसले असते. तसं झालं तर आमच्या सुभेदाऱ्या धोक्यात येतील अशी भीती असल्यानं मराठा समाजाला न्याय मिळू शकला नाही अशी टीका खोत यांनी केली.

मात्र मराठा समाज आता जागा झाला असून सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यावंच लागेल, असंही खोत म्हणाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रयत क्रांती संघटनेच्या वतीनं सद्या आंगणामध्ये कुटुंबीयांसह हे आंदोलन करण्यात आलं. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत हे राज्यव्यापी आंदोलन सुरू राहणार असल्याचं खोत यांनी म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत राम शिंदेंनी घेतली उदयनराजेंची भेट

News Desk

सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका निवडणुकीत यांचा झाला विजय ?

swarit

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळांचा शुभारंभ

News Desk