HW News Marathi
महाराष्ट्र

“दरेकरांना काय आरोप करावे याचं भान राहिलं नाही”, रूपाली चाकणकरांनी सुनावलं!

मुंबई | राज्यात कोरोनाचा कहर सुरु आहेच पण त्याहून जास्त राजकारण सुरु आहे. रेमडेसिवीर, ऑक्सिजन, इतर औषधे याच्या तुटवड्यावरुन विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्यात जुंपली आहे. मात्र, याचा भुर्दंड सामान्य नागरिकांना भोगावे लागत आहे. दरम्यान, राज्यात कोरोना लसींचा तुटवडा होत असल्याचं राज्य सरकारने वारंवार केंद्र सरकारला सांगितले आहे. मात्र, केंद्र सरकार मुबलक पुरवठा करत आहे, ठाकरे सरकार तुटवडा निर्माण करत आहे, असा आरोप विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केला होता. त्यांच्या या आरोपांचा समाचार राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी घेतला आहे.

काय म्हणाल्या रूपाली चाकणकर?

एकीकडे मोदीजी महाराष्ट्राचं कौतुक करत आहेत , आज नीती आयोगाच्या अध्यक्षांनी देशभरात यशस्वी ठरत असलेल्या मुंबई मॉडेलचं कौतुक केलं आहे तर दुसरीकडे प्रवीणजी दरेकर यांना महाराष्ट्र द्वेषाने एवढं पछाडलं आहे की त्यांना काय आरोप करावे याचं सुद्धा भान राहिलेलं नाहीये.

 

काय म्हणाले होते प्रवीण दरेकर?

केंद्राने मुबलक साठा पाठवलाय, ठाकरे सरकार लसींचा जाणुनबुजून तुटवडा निर्माण करतंय, दरेकरांचा गंभीर आरोप

राज्यात कोरोना लसींचा मुबलक साठा आहे. मात्र, नागरिकांमध्ये केंद्र सरकारविरोधात रोष उत्पन्न करण्यासाठी ठाकरे सरकार जाणुनबुजून सामान्य नागरिकांना लस उपलब्ध करुन देत नसल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला होता. लसीकरणाच्या मुद्द्यावरुन राजकारण होता कामा नये. मात्र, ठाकरे सरकार केंद्र सरकारला बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक कट आखून काम करत असल्याची टीका प्रवीण दरेकर यांनी केली.

तसेच, नितीन गडकरी यांच्या भाषणाचा संदर्भ देतही रुपाली चाकणकर यांनी प्रवीण दरेकारांना सुनावलं होतं.

काय म्हणाल्या रुपाली चाकणकर?

अशी वक्तव्य करून तुम्ही सन्माननीय पंतप्रधान मोदीजींचा अपमान करताय.नितीनजी गडकरींनी कालच्या एका भाषणात अशा प्रकारचं गलिच्छ राजकारण करणाऱ्या भाजप नेत्यांची चांगलीच कानउघडणी केली आहे , ते भाषण अजून तुमच्यापर्यंत आलेले दिसत नाही, वाटल्यास त्याची लिंक आम्ही तुम्हाला देऊ शकतो.

 

काय म्हणाले होते नितीन गडकरी?

‘कोरोनाच्या काळात आपल्याला कार्यकर्ता गमावणे हे न परवडणारे आहे. अनेक कार्यकर्ते आपण आतापर्यंत गमावले आहे. पक्षाची कामं होत राहतील, पण तुमचा जीव वाचला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे, पुढे अनेक कामं करता येईल. त्यामुळे हात जोडून विनंती आहे, तुमची आणि कुटुंबाची काळजी घ्या, ज्यांनी लस घेतली नाही, त्यांनी लस घ्यावी, लोकांना लसीकरण केंद्रावर नेण्यास मदत करावी, कुणाचं झालं नाही, याची काळजी घ्यावी’ अशी विनंतीही गडकरींनी केली.

‘यात राजकारण करू नये, आपण सगळ्याच गोष्टीमध्ये बोर्ड लावले पाहिजे, झेंडे लावले पाहिजे, याची गरज नाही. लोकांना माहिती आहे. यावेळी लोकांना आपण राजकारण केलं तर लोकांना हे आवडणार नाही. तुम्ही जे काही चांगले काम केले, ते लोकांपर्यंत पोहोचणारच आहे. त्याचे क्रेडीट आपोआप तुम्हाला आणि पक्षाला मिळणार आहे’ असं म्हणत गडकरी यांनी नेत्यांना खडेबोल सुनावले.

देवेंद्र फडणवीस हे नुकतेच गडचिरोलीचा दौरा करून आले आहे. दौरा करणे ठीक आहे. पण आताच्या परिस्थिती खूप गरजेचं असेल तरच जावे, गाडीत किती लोकं बसणार आहे, लोकांमध्ये किती मिसळायचे याचा विचार करावा. शक्यतो व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधवा, हल्ली तर मोबाईलवरही सहज शक्य आहे, अशी सूचनाही गडकरींनी केली.

‘आपण जे काम करतोय, ते वृत्तपत्र, सोशल मीडिया आणि टीव्हीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतच आहे. आपण जे करतोय, त्याची माहिती लोकांना मिळणे याचा बागुलबुवा करणे हे योग्य नाही. मी फोटो पाहिलेत की, एका ठिकाणी एकच ऑक्सिजन सिलेंडर देत असताना चार जण फोटो काढून शेअर करत आहे, असं काही करू नका. आपल्याबद्दलची प्रतिमा ही वाईट होईल, असंही गडकरींनी कार्यकर्त्यांनी बजावले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये वाढ सुरुच!

News Desk

शरद पवारांनी मला पक्षात घेतले नसते तर मी बाद झालो असतो –  एकनाथ खडसे

News Desk

“आमच्याकडे बाळासाहेब थोरातांचा कुठलाही राजीनामा आलेला नाही”, नाना पटोलेंची प्रतिक्रिया

Aprna