मुंबई | विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना सर्व पक्षातील प्रचारसभांचा धडाका सुरू केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आज (१४ ऑक्टोबर) उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यात सात सभा होणार आहेत. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावती, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात सभा घेतील. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आजची पहिली सभा यवतमाळमधील वणीत तर दुसरी सभा संध्याकाळी पुण्यात होणार आहे.
भाजपचे नेत्यांनी घेतलेल्या प्रचार सभेत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत काश्मीरमधील कलम ३७०वर मुद्यावर राजकारण करत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. भाजप सरकारकडे राज्यातील बेरोजगारी, शेतकरी आणि उद्याग याविषयावर न चर्चा करत नाहीत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या आज औरंगाबादेतल्या कन्नड आणि वैजापूरमध्ये, अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव आणि कोपरगाव येथे चार सभा आयोजित आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांच्याही परभणी, जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यांमध्ये चार सभा होणार आहेत. तर, एमआयएमच्या उमेदवारासाठी असदुद्दीन ओवेसींची आज रात्री भिवंडीत सभा घेणार आहेत.
युतीच्या उमेदवारांसाठी राज्यातील नेत्यांसोबतच केंद्रातील नेतेही प्रचारसभा घेणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय नेते आणि केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह मुंबईतील गोरेगाव, मीरा रोड आणि चारकोप येथील सभांना संबोधित करतील. तर स्मृती इराणी यांच्या इंदापूर, सांगली आणि इचलकरंजीत प्रचारसभा होणार आहेत. याशिवाय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आज लोणावळा, नाशिक, औरंगाबाद आणि नागपुरात प्रचारसभा होणार आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.