HW News Marathi
देश / विदेश

#PulwamaAttack : मुख्यमंत्र्यांची शहीद जवानांच्या कुटुंबियांना ५० लाखांची मदत

सांगली | जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा भागात सीआरपीएफच्या ताफ्यावर दशतवाद्यांनी गुरुवारी (१४ फेब्रुवारी) झालेल्या हल्ल्यात ३८ जवान शहीद झाले आहेत. या हल्लात महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील २ जवान शहीद झाले आहेत. या महाराष्ट्रातील जवानांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कुटुंबांना प्रत्येक ५० लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा केली आहे. तसेच शहीद जवानांच्या कुटुंबीयांचे पुनर्वसनसुद्ध करण्यात येणार असल्याचे देखील मुख्यमंत्रांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणास आलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमा वेळी ते बोलत होते.संजय राजपूत हे बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर रहिवासी होते. सीआरपीएफच्या ११५ बटालियनचे जवान होते. नितीन राठोड लोणार तालुक्यातील या चोरपांग्रा गावातील आहेत. या दोन्ही जवानांना प्रत्येक ५० लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अटल बिहारी वाजपेयी पंचतत्त्वात विलीन, मुलगी नमिताने दिला मुखाग्नी

News Desk

इस्रोच्या G SAT-29 या संचार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

News Desk

आयकर रिटर्न भरण्याची तारिख पुढे ढकलण्याची मुख्यमंत्र्यांची केंद्र सरकारकडे मागणी

swarit