श्रीनगर | पुलवामामधील गुरुवारी (१४ फेब्रुवारी) दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे जवान शहीद झालेल्या जवानांच्या पार्थिवांना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी खांदा देऊन श्रद्धांजली वाहिली. हा हल्ला अवंतीपुरामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ३८ जवानांना वीरमरण आले.
#WATCH: Home Minister Rajnath Singh and J&K DGP Dilbagh Singh lend a shoulder to mortal remains of a CRPF soldier in Budgam. #PulwamaAttack pic.twitter.com/CN4pfBsoVr
— ANI (@ANI) February 15, 2019
या सर्व शहीद झालेल्या जवानांना सुरक्षा दलाकडून श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर जवानांचे पार्थिव त्यांच्या घरी पाठवण्यात येत आहेत. यावेळी राजनाथ सिंह यांनी शहीद जवानांना खांदा दिला. शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पालम विमानतळावर जाऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही, यावेळी राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. या हल्ल्यातील जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ दिले जाणार नाही, अशा शब्दात त्यांनी पाकिस्तानचे नाव न घेत धकी वजा इशारा दिला आहे आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, झांशी येथील सभेत बोलताना म्हटले की, सुरक्षा दलांना कारवाई करण्याची सर्व अधिकार दिले आहेत. आता देशातील १३० कोटी जनता एकजुटीने या हल्ल्याला सडेतोड उत्तर देईल.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.