पुणे | राज्यात अनेक शहरात कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. पुण्यात आज (२२ जुलै) नव्याने १,७५१ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकूण संख्या ४२,४६६ झाली आहे. तर ८८३ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या १६,२६९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील एकूण तपासणी आता २,२३,०३९ झाली असून आज ७,५९५ टेस्ट घेण्यात आल्या.
दिवसभरात नवे १,७५१ कोरोनाबाधित !
पुणे शहरात आज नव्याने १,७५१ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४२ हजार ४६६ इतकी झाली आहे.#PuneFightsCorona
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) July 22, 2020
पुण्यात ८८३ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या २५ हजार १२९ झाल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
कोरोनामुक्त संख्येने २५ हजारांचा टप्पा ओलांडला !
शहरातील ८८३ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या २५ हजार १२९ झाली आहे. उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टर्स आणि टीमचे मनःपूर्वक धन्यवाद !#PuneFightsCorona pic.twitter.com/laoHOMOpj9
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) July 22, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.