HW News Marathi
महाराष्ट्र

चंद्रकांत पाटलांचा वारसा संग्राम देशमुख चालवणार ? पुणे पदवीधरसाठी भाजपचे उमेदवार !

पुणे | पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपकडून संग्राम देशमुख यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.या मतदारसंघातून अनेक जण इच्छुक होते मात्र भाजपने उमेदवारी पश्चिम महाराष्ट्रातचं पुन्हा एकदा दिली आहे .भाजपने पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या चार उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत उमेदवारांची नावं निश्चित केल्याची माहिती आहे. शिरीष बोराळकर, संग्राम देशमुख, संदीप जोशी आणि नितीन धांडे यांना भाजपने तिकीट दिले आहे.

भाजपकडून संग्राम देशमुखचं का ?

पुणे पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा हक्काचा मतदारसंघ मानला जातो. मागच्या दोन्ही निवडणुकांमध्ये या मतदारसंघातून चंद्रकांत पाटील यांनी बाजी मारली होती. त्यामुळे ही जागा जिंकणे भाजपच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे.संग्राम देशमुख यांना उमेदवारी मिळाल्याने पुणे पदवीधरसाठी चुरशीची लढत होणार आहे.संग्राम देशमुख हे सांगली जिल्ह्यातील मोठे प्रस्थ आहे.साखरकारखाने,सुतगिरणी आणि शिक्षणसंस्था असा त्यांचा कार्यभार मोठा आहे .ते सध्या जिल्हापरिषदेचे अध्यक्षही आहेत.त्यामुळे पुणे पदवीधरच्या निवडणुकीत भाजपकडून संग्राम देशमुख हे चंद्रकांत पाटील यांचा वारसा चालवणार का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आगामी निवडणुकांसाठी प्रशांत किशोर देणार का शिवसेनेला साथ ?

News Desk

लोकाभिमुख प्रशासनाद्वारे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करणार –  जिल्हाधिकारी डोंगरे                          

News Desk

विधानपरिषदेच्या चारही जागांचे निकाल जाहीर

News Desk