HW News Marathi
Covid-19

पुण्यात १३ जुलैपासून पुन्हा लॉकडाऊन, लवकरच नियमावली जारी करणार

पुणे | राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पुण्यात देखील संख्या वाढल्याने चिंतेचे वातावरण पसरत आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडसह संपूर्ण पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. त्यानुसार येत्या १३ जुलैच्या मध्यरात्रीपासून पुढचे १५ दिवस लॉकडाऊन असेल. लवकरच याची सविस्तर नियमावली जारी केली जाणार आहे.

१३ जुलैपासून पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कडक लॉकडाउन घेण्यात आला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची वाढत्या संख्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे अजित पवार यांनी सांगितले. पुणे आणि पिपंरी चिंचवडमध्ये गेल्या २ आठवड्यांपासून मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. शहरांसह लगतच्या ग्रामपंचायत क्षेत्रातील वाढती रुग्णसंख्या पाहून प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे.

यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनीही पुन्हा लॉकडाऊन करण्याचा इशारा दिला होता. “कोरोनाचा धोका टळलेला नाही. तरीही पुण्यात काही नागरिक कोणत्याही कारणाशिवाय घराबाहेर पडत आहेत. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास प्रशासनाला आणखी कडक भूमिका घ्यावी लागेल. वेळप्रसंगी पुन्हा लॉकडाऊन घोषित करावा लागेल, असा इशारा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी चार दिवसांपूर्वी दिला होता.

लॉकडाऊन का करावा? काय आहेत अजित पवार यांनी दिलेली कारणं?

१) पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये लोक काही कारण नसताना घराबाहेर पडत आहेत

२) काही लोक मास्क न घालताना वावरत आहेत

३) करोनाचा धोका अद्यापही टळलेला नाही

४) पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील रुग्णसंख्या वाढली आहे

५) करोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही काही नागरिक लॉकडाउनचे नियम पाळत नसल्याचं चित्र आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात काल ७८२७ नवे रुग्ण आढळले, तर ३३४० जण झाले कोरोनामुक्त

News Desk

काँग्रेसनं १०० वर्षे सत्तेत न येण्याचं ठरविलं!; पंतप्रधानांचा संसदेत काँग्रेसवर घाणाघात

Aprna

कोरोनाच्या अजून किती लाटा येणार, सांगू शकत नाही’! –  तात्याराव लहाने

News Desk