HW News Marathi
Covid-19

पुण्यात कंटेनमेंट झोनमध्ये दवाखाने वगळता सर्व दुकाने १७ मेपर्यंत बंद

पुणे | महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात मुंबई पाठोपाठ पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुण्यात वाढत्या रुग्णांच्या संख्या आढोक्यात आण्यासाठी लॉकडाऊनच्या नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यात कंटेनमेंट झोनमध्ये दवाखाने वगळता सर्व दुकाने ११ मे ते १७ मे पर्यंत बंद ठेवण्यात येेणार आहे.

पुणे शहरात अत्यंत आवश्यकता भासल्यास कंटेनमेंट झोनमध्ये दूध, भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा महापालिका आणि पोलीस यांच्या मार्गदर्शनाखाली परिस्थिती लक्षात घेता घरपोच किंवा मोकळ्या जागेत सुरक्षित अंतर ठेवून करता येणार अशी माहिती पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी आज (१० मे) हा आदेश दिला आहे.अन्यथा कंटेनमेंट झोनमध्ये दवाखाने वगळता इतर सर्व दुकाने १२ मे पासून १७ मे पर्यंत बंद राहतील. पुणे शहरात ६९ कंटेनमेंट झोन आहेत.

दरम्यान, ज्येष्ठ नागरिक कक्षाकडून शहरातील ११ हजार २०० ज्येष्ठ नागरिकांबरोबर वैयक्तिक पातळीवर संपर्क करून त्यांची विचारपूस करण्यात आली आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यात येत असून त्यांना जीवनावश्यक वस्तू, घरपोच डबा, औषधे पोहचविण्यात येत आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आमचे सरकार नाही, शिवसेनेचे सरकार आहे !

News Desk

लॉकडाऊनमध्ये दररोज दीड लाख लोकांना मिळणार ‘शिवभोजन थाळी’, छगन भुजबळांची माहिती

News Desk

राज्यातील कडक निर्बंध आणखी १५ दिवसांसाठी वाढले

News Desk