HW News Marathi
महाराष्ट्र

माजी खासदार संजय काकडेंना पुणे पोलिसांचा दणका,’या’ प्रकरणी केली अटक

पुणे | माजी खासदार संजय काकडे यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. कुख्यात गुन्हेगार गजानन मारणे याने तुरुंगातून सुटल्यानंतर मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे वर शेकडो कारचा सहभाग असलेली रॅली काढली होती. या प्रकरणात दाखल गुन्ह्यात ही कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे.

कुख्यात गुन्हेगार गजानन मारणे हा तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर त्याच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मुंबई-पुणे एक्सप्रेसवर रंगली काढली होती. त्यात शेकडो वाहनांचाही समावेश होता. या प्रकरणी ही कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.

कुख्यात गुंड गजा मारणे याची तळोजा कारागृहातून काढलेल्या मिरवणुकीप्रकरणी माजी खासदार संजय काकडे यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. गजा मारणेच्या मिरवणुकीत संजय काकडे यांच्या गाड्या होत्या. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. संजय काकडे यांची वाहने गजा मारणेच्या रॅलीत होती अशी माहिती आहे.

याच रॅलीच्या संदर्भात संजय काकडे यांना अटक झाल्याची प्राथमिक माहिती आहे. संजय काकडे यांना आज दुपारी कोर्टात हजर केलं जाणार आहे. शिवाजी नगर कोर्टात हजर केल्यानंतर, पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता अधिक माहिती देतील, असं सांगण्यात येत आहे.

गजा मारणे कोण आहे?

गजा उर्फ गजानन मारणे हा पुण्यातील कुख्यात मारणे टोळीचा म्होरक्या आहे. कोथरुडसह पुण्यात त्याची दहशत आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात त्याच्याविरोधात २४ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे.

पप्पू गावडे आणि अमोल बधे खून खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर गजा मारणेच्या साथीदारांनी त्याची तळोजा कारागृहाबाहेरुन मिरवणूक काढली होती. गजा मारणे हा त्याच्या साथीदारांसह द्रुतगती महामार्गावरुन पुण्याच्या दिशेने येत होता. या मिरवणुकीत जवळपास ३०० गाड्या होत्या. त्यावेळी त्याच्या साथीदारांनी उर्से टोल नाका येथे थांबून फटाके वाजवून आरडा-ओरडा केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ‘हा’ निर्णय घेतल्यामुळे गोपीचंद पडळकरांनी मानले आभार

Aprna

बेळगावमध्ये मतदानाला सुरुवात, शुभम शेळके की मंगला अंगडी कोण बाजी मारणार?

News Desk

घरभाडे वसुली तीन महिने पुढे ढकलावी घर भाडे न दिल्याने भाडेकरूंना निष्कासित करू नये, राज्य सरकारच्या सूचना

News Desk