HW News Marathi
देश / विदेश

पुण्यात १००० लोकांना Quarantine करणारी व्यवस्था शासनाला अर्पण !

पुणे | संपुर्ण जगामध्ये कोरोनाने हाहाःकार माजवलेला आहे. भारतामध्ये तोंड खुपसलेले आहे. मोठ्याप्रमाणावर याची लागण झालेली. आपण दुस-या फेजमध्ये आहोत. भारताचे मा. पंतप्रधान, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व प्रशासन अहोरात्र अथक परिश्रम करून कोरोनाला रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु अनेक लोक परदेशातून भारतात आजही येत आहेत. त्यांच्या संपर्कात येणा-या लोकांना शोधावे लागते. कारण १४ दिवसांच्या कालावधीत याचा संसर्ग कोणालाही होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनावर खूप मोठी जबाबदारी येते की अशा सर्व संशयितांना किंवा संपर्कात आलेल्यांना एकत्र बोलवुन १४ दिवस quarantine मध्ये ठेवणे. १४ दिवस quarantine मध्ये ठेवण्याची प्रक्रिया जितकी जास्त चांगली होईल तितक्या लवकर कोरोना आटोक्यात येण्यास मदत होईल. राज्य शासनाकडे यासाठी लागणारी व्यवस्था कमी पडू शकते. यासाठी ज्या संस्थांकडे अथवा व्यक्तिंकडे अशी व्यवस्था असल्यास ती शासनास उपलब्ध करून दिल्यास आपण कोरोनाला रोखु शकतो.

भारतीय जैन संघटना ही एक स्वयंसेवी संस्था आहे. १९९३ साली जेव्हा लातूरला भूकंप झाला होता त्यावेळी १२०० अनाथ मुलांना आपण पुण्यामध्ये आणलेलं होतं. आदरणीय शरद पवार यांच्या प्रेरणेने मोठ्या वस्तीगृह आपण उभं केलेलंआहे आणि या वस्तीगृहामध्ये आत्ता सध्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले-मुली शिक्षण घेत आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या आठ दिवसात या सर्व मुला-मुलींना आम्ही त्यांच्या घरी सुखरूप पोहोचलेला आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी १००० व्यक्तिंसाठी quarantine ची व्यवस्था या अद्ययावत सेंटरमध्ये होऊ शकेल असा विचार आमच्या मनात आला आणि भारतीय जैन संघटनेच्यावतीने हे सेंटर उपलब्ध करुन देऊन शासनाला जर योग्य वाटलं तर शासन या ठिकाणी एक हजार लोकांना quarantine करण्याची व्यवस्था करू शकते.

‘मला असं वाटतं की इतक्या मोठ्या अशा रोगाला आपल्याला सामोरे जायचे असेल तर प्रत्येकाने आपापल्या परीने आपापलं योगदान देणे जरुरी आहे. आपण घराच्या बाहेर न पडण्याचं मोठं योगदान देतं आहात. तशाच पध्दतीचं हे योगदान सर्वांनी मिळून दिलं तर निश्चितपणे आपण कोरोनाला हरवू शकू. चला आपण शासनाला आणि प्रशासनाला मोठ्याप्रमाणावर सहकार्य करून कोरोनाला हरविण्याचा प्रयत्न करूया’- शांतीलाल मुथ्था

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या अंगावर टाकला काळा कपडा

News Desk

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या चक्रातून बाहेर पडा, भाजपशी युती करा ! आठवलेंचीही उद्धव ठाकरेंना साद

News Desk

मराठा आरक्षणावर आजपासूनच सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू

News Desk