HW News Marathi
देश / विदेश

राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे ‘कोरोना निगेटिव्ह’

नवी दिल्ली | बॉलिवूडची गायिका कनिका कपूर ही कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने तिच्या सोबत ज्या-ज्या व्यक्ती पार्टीत सामील होत्या त्या सगळ्यांनाच धास्ती बसली आहे. दुष्यंत सिंह यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतल्याकारणाने राष्ट्रपतींनीही कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे शिंदे कोरोना व्हायरसपासून सुरक्षित आहेत. कोरोनाबाधित कनिका कपूरशी संपर्कात आल्याने वसुंधरा यांनी कोरोनाची चाचणी केली होती. त्या चाचणीत त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याने त्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. वसुंधरा राजे यांनी ट्विटरवरुनही रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे सांगितले आहे.

‘काही दिवसांपूर्वी दुष्यंत आणि त्यांच्या सासरच्या काही लोकांसोबत मी लखनऊच्या एक डिनरसाठी उपस्थित झाले होते. कोरोना व्हायरसची लागण झालेली गायिका कनिका कपूरही त्या डिनरमध्ये अतिथी म्हणून उपस्थित होती. खबरदारीचा उपाय म्हणून मी आणि दुष्यंत सेल्फ आयसोलेशनमध्ये आहोत. आम्ही सर्व निर्देशांचे पालन करत आहोत’ असे ट्विट करत वसुंधरा राजे यांनी माहिती दिली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाकिस्तान नमले, कमांडर अभिनंदन भारतात परतणार, इम्रान खानची घोषणा

News Desk

राम मंदिराच्या भूमिपूजनादिवशी ओविसी यांचे ट्विट, “बाबरी मशिद होती आणि राहील”

News Desk

ओडिशा, आंध्र प्रदेशात ‘तितली’ चक्रीवादळाचा हाहाकार

swarit