HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

राधाकृष्ण विखे- राम शिंदे यांच्यात दिलजमाई ?

मुंबई | विधानसभा निवडणुकीत अहमदनगरमध्ये राम शिंदे यांच्या पराभवाला माजी विरोधी पक्षनेते आणि सध्याचे आमदार राधाकृष्ण विखे- पाटील यांना दोषी धरण्यात आले होते. याचाच खुलासा करण्यासाठी आज मुंबईत भाजपने नगर भाजप कोअर कमिटीची बैठक बोलावली होती. बैठकीपूर्वी विखेंवरील आरोप सिद्ध झाल्यानंतर यांच्यावर काय कारवाई होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. मात्र, प्रत्यक्षात कोअर कमिटीची बैठक झाल्यानंतर विखे पाटील आणि राम शिंदे या दोन्ही नेत्यांनी बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगून पक्षाच्या निर्णयावर समाधानी असल्याची प्रतिक्रिया माध्यमांना दिली.

या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील, माजी मंत्री राम शिंदे आणि अहमदनगरमधील भाजप नेते उपस्थित होते. बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली असून अंतर्गत निर्णय जाहीर करायचे नसतात, अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठकीनंतर दिली. तर विजय पुराणिक समिती यासंबंधी अहवाल सादर करणार असून त्यानंतर पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती माजी मंत्री राम शिंदे यांनी दिली. तसेच, विखे पाटील म्हणाले, प्रत्येक पक्षात नाराजी असते.

आम्ही आमची बाजू देवेंद्र फडणवीसांसमोर मांडली आहे. मात्र अंतर्गत निर्णय जाहीर करायचे नसतात. तर, भाजपबाबत राम शिंदे बोलतील, असं उत्तर सुजय विखे यांनी दिलं होतं. दरम्यान, विखे आणि आम्ही पराभवानंतर पहिल्यांदाच समोरासमोर आलो, असं राम शिंदे यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं. पक्षाला आम्ही आमच्या व्यथा आणि अनुभव सांगितले. दोन्ही बाजू ऐकून घेतल्या गेल्या. विजय पुराणिक यासंबंधी अहवाल सादर करणार आहेत. त्यानंतर पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. पक्षाच्या निर्णयामुळे समाधान मिळाल्याचं शिंदेंनी सांगितलं.

Related posts

मी एकट्या भाजपचा नव्हे, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री !

News Desk

…तरीही मी फडणवीसांना महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला महारोग म्हणणार नाही !

News Desk

यंदा आपल्याला प्रदूषणमुक्त गणेशोत्सव साजरा करायचा आहे !

News Desk