हाथरस | उत्तरप्रदेशातील हाथरस येथे सामूहिक बलात्कारा झाल्यानंतर देशभरातून याविरोधात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आणि राहुल गांधी पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी हाथरसला रवाना झाले आहेत. मात्र त्याआधीच जिल्ह्यात १४४ कलम लागू करण्यात आलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत हे आदेश लागू आहेत. तर सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत.
राहुल गांधी आणि प्रियंका गांधींच्या स्वागतासाठी दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. पोलिसांनी यमुना एक्स्प्रेस-वेवर राहुल आणि प्रियंका गांधी यांना रोखण्यास आले. यावेळी फक्त दोघांनाच पुढे जाण्याची परवानगी देण्यात आली होती आणि कार्यकर्ते व इतर नेत्यांना रोखण्यात आले होते. पुढे गेल्यानंतर जेव्हा पुन्हा पोलिसांनी रोखले तेव्हा मात्र राहुल गांधी आणि प्रियंका गांधी कार्यकर्त्यांसोबत पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला.
Priyanka Gandhi Vadra along with Congress workers walks along the Yamuna Expressway, after her vehicle was stopped by the authorities.
She is on her way to Harthras, to meet the family of the 19-year-old who was allegedly gang-raped. pic.twitter.com/1RP8Bvco8G
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) October 1, 2020
प्रियंका गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना योगी सरकारने महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली पाहिजे असे म्हटले आहे.या प्रकरणी योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणी एसआयटीने तपास सुरु केला आहे. एसआयटी टीम आज (१ ऑक्टोबर) पीडित कुटुंबाची भेट घेणार आहे. परिस्थिती पाहता प्रसारमाध्यमांना परवानगी दिली जाणार नाही आहे.
Delhi: Congress leaders Rahul Gandhi and Priyanka Gandhi Vadra leave for Hathras in Uttar Pradesh where a 19-year-old woman was gang-raped. pic.twitter.com/9tePa8NLrg
— ANI (@ANI) October 1, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.